बुलडाणा महाराष्ट्र

धक्कादायक! प्रसूती कळा येत नसताना गर्भपिशवीत हात घालून बाळाला बाहेर खेचलं अन…

बुलडाणा | प्रसुतीकळा नसताना सुद्धा डाॅक्टरांनं जबरदस्ती महिलेची प्रसूती केली या घटनेत बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुलडाणा तालुक्यातील ही धक्कादायक घटना घडली आहे. तसेच गर्भपिशवीत हात घालून बाळाची ओढाताण करून बाळाला बाहेर काढल्यानं बाळाचा मृत्यू झाल्याचं पिडीत महिलेनं म्हटलं आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील आसलगाव या गावची रहिवाशी असलेल्या शारदा संजय भोंगळे यांची जळगाव जामोद येथील समाधान हाॅस्पिटलमध्ये प्रसूती होणार होती. मात्र प्रसुतीकळा सुरू होण्याच्या आधीच प्रसूती केल्यानं सुदृढ बालक दगावल्याचा आरोप शारदा यांचा पती संजय भोंगळे यांनी केला. संजय यांनी हाॅस्पिटलविरोधात तक्रारही दाखल केली.

मात्र डाॅक्टरांवर कसलीच कारवाई करण्यात आली नसल्यानं संजय यांनी उपविभागीय कार्यालयातील खांबाला स्वतःला बांधून घेत हॅन्ड लाॅक करत आमरण उपोषण केलं. संजय यांच्या उपोषणानं प्रशासनाची चांगलीच झोप उडाली. अखेरीस सुनिल यांना लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर त्यांनी उपोषण थांबवलं आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे. संजय भोंगळे यांची तक्रार दाखल करून का घेतली नाही, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

देशात कोरोनाचा हाहाकार…. कोरोनाबाधितांचा आकडा 13 लाख पार!

फिरणं आवश्यक आहे, मी नाही म्हणत नाहीये पण….- उद्धव ठाकरे

…म्हणून डोक्यावरचे केस गेलेले दिसतायेत; उद्धव ठाकरेंनी सांगितलं खरं कारण

तुकाराम मुंढे इन ऍक्शन मोड! कामचुकार कर्मचाऱ्यांना दिला चांगलाच दणका…

प्रियंका गांधी आता नव्या घरात शिफ्ट होणार, ‘या’ शहरात असेल नवा बंगला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या