बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजा कायम पण ताण वाढेल; पाहा आणखी काय म्हटलंय भेंडवळच्या भविष्यवाणीत

बुलडाणा | बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या भविष्यवाणीकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं असतं. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी इथे पीक-पाणी, पाऊसमान याबाबतचा अंदाज वर्तवला जातो.

भेंडवळची पीक-पाण्याबाबतची भविष्यवाणी जाहीर झाली आहे. केवळ चौघांच्या उपस्थितीत भेंडवळ घटमांडणीचं भाकीत जाहीर करण्यात आलं. यंदा पाऊस भरपूर होईल पण पीक परिस्थिती साधारण राहील, देशात नैसर्गिक आपत्ती ओढावेल, देशाचा राजा कायम राहील, असं भाकीत भेंडवळच्या भविष्यवाणीत वर्तवलं आहे.

चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सहकारी सारंगधर महाराज यांनी सकाळी सूर्योदयावेळी हे भाकीत वर्तवलं आहे.

दरम्यान, यंदा वर्तवण्यात आलेल्या भाकितामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात होईल, देशावर नैसर्गिक संकट ओढवेल. संरक्षण व्यवस्था मजबूत जरी असली तरी शत्रूच्या कारवाया सुरुच राहतील, त्यामुळे सर्वांना सोबत राहून संकटाशी सामना करावा लागेल, असं म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे- रितेश देशमुख

“लॉकडाऊन संपण्याची चिन्हं नाहीत, हे प्रकरण मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाणार”

महत्वाच्या बातम्या-

फेसबुक-जिओ भागिदारीचा नवा अध्याय; व्हॉट्सअपच्या मदतीनं ‘जिओमार्ट’ सुरु

या आहेत मुंबईच्या महापौर!; पण त्या अशा वेषात रुग्णालयात का पोहोचल्या???

पोलिसांनी वारंवार सांगूनही ऐकलं नाही; ‘या’ कारणामुळे पुणे पोलिसांनी पकडले ६९९ जण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More