पुणे पोलिसांची सर्वात मोठी कारवाई; ‘या’ भागातील पब, बारवर फिरवला बुलडोझर

Pune l गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. या वाढत्या घटना पाहता पुणे, मुंबई, ठाणे या मुख्य शहरांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी कारवाईचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिलेल्या आदेशानंतर मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्यातील अनेक भागातील पब, हॉटेल आणि बारवर बुलडोझरची कारवाई करण्यात आली आहे.

100 पब आणि बारचा परवाना रद्द :

अशातच आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुण्यातील देखील बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाऱ्या पब, हॉटेल आणि बारवर बुलडोझरची कारवाई करण्यात आली आहे. पुणे महापालिका आणि पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 32 बेकायदा पब आणि बार बुलडोझ करून ते जमीनदोस्त करण्यात आले आहेत.

एवढेच नाही तर पुणे उत्पादन शुल्क विभागाने जवळपास 100 पब आणि बारचे परवाने देखील रद्द केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर सुरू झालेल्या बुलडोझरच्या कारवाईत बारनेर, कोरेगाव पार्क, बालेवाडी, शिवाजीनगर, येरवडा, कल्याणीनगर, संगमवाडीसह इतर अनेक भागात कारवाई करण्यात आली आहे. येथील 32 पब आणि बार पाडण्यात आले आहेत. याशिवाय आणखी अनेक पब आणि बार महापालिका आणि पोलिसांच्या रडारवर असून, त्यांच्यावर येत्या काही दिवसांत कारवाई होणार हे निश्चित आहे.

Pune l पुणे पोलिसांची बार आणि पबवर कारवाई :

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याला अमली पदार्थमुक्त शहर बनवण्याच्या उद्देशाने बार आणि पबवर बुलडोझरची कारवाई करण्यात येत आहे. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याचे पोलीस प्रमुख अमितेश कुमार यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पुणे जिल्हा प्रशासन आणि महापालिका तात्काळ कारवाईत आली आहे.

पुणे शहर अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पबवर कडक कारवाई करावी, असे मुख्यमंत्री कार्यालयाने निवेदनात म्हटले आहे. ड्रग्जशी संबंधित बेकायदा बांधकामांवर बुलडोझरचा वापर करावा, अशा सूचना सीएम शिंदे यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातेही आहे. ते म्हणाले की, राज्य सरकार अंमली पदार्थांविरुद्ध झिरो टॉलरन्सचे धोरण अवलंबत आहे. पुण्यापर्यंत बुलडोझरची कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा फडणवीस यांनी दिला होता.

News Title – Bulldozer action was taken on pubs and bars in Pune

महत्त्वाच्या बातम्या

टीम इंडियाचा दणदणीत विजय! इंग्लंडच्या पराभवाची ही आहेत 3 कारणे

या राशीच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी

मोठी बातमी! आमदारांनी अजितदादांचं टेंशन वाढवलं

मुख्यमंत्री पदाबाबत संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य!

रोज एक डाळिंब खाण्याचे ‘इतके’ फायदे ऐकून तुम्हीही चकित व्हाल!