बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आमदार गोपीचंद पडळकरांना अटक करून दाखवाच”

सांगली |  बैलगाडा शर्यतीच्या मुद्यावरून राज्यात राजकारण तापण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात कायद्यानुसार बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यास असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील झरे या गावात 20 ऑगस्ट रोजी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केलं आहे. याच पार्श्वभूमीवर माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी पडळकर यांना पाठिंबा देत ठाकरे सरकारलाही इशारा दिला आहे.

सरकारला बैलगाडीवरच्या विषयावर शांततेत उत्तर देता आलं असतं, घोड्यांच्या शर्यती चालतात, मग बैलांच्या शर्यती का चालत नाही. असं  सत्तेत येण्याअगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगत होते. त्याचं काय झालं?, मग आता अस्वलींच्या शर्यती चालू करायच्या काय?, असा खोचक सवालही सदाभाऊ खोत यांनी सरकारला विचारला आहे.

बैलगाडी शर्यत ही होणार म्हणजे होणार. जर शर्यती झाल्या नाही तर सरकारला मोठ्या संघर्षाला समोरे जावं लागेल. आमदार पडळकर यांना सरकारने अटक केली तर आमच्यात काय हिंमत आहे ती आम्ही सरकार दाखवू, असंही खोत यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या विरोधात महाविकास आघाडी सरकार इतका बळाचा वापर का करत आहे. सत्तेत आलं की शेतकऱ्यांना गोळ्या घालतात. राष्ट्रवादी काँग्रेसचा हा इतिहासच आहे. त्यात उद्धव ठाकरे आपणही सामील झाले आहात. मला अटक करणार हे मला माहिती आहे, परंतु गोवंशाच्या अस्तित्वासाठी बैलगाडी शर्यत होणारच, असा पवित्रा गोपीचंद पडळकर यांनी घेतला आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

“योगी आदित्यनाथ म्हणजे राजकारणातील राम”

नारायण राणेंच्या दर्शनानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला दुग्धाभिषेक आणि गोमूत्राने शुद्धीकरण

“आधी केलेली पाप धुवून काढा, मगच आशीर्वाद मागा”

‘…त्यानंतर मी स्वतः ईडी समोर जाणार’; अनिल देशमुखांनी सोडलं मौन

“शिवरायांप्रमाणे मलाही स्वकियांनी त्रास दिला”; शिवसेना सोडताना आशाताई आक्रमक

“तालिबानचं समर्थन करणाऱ्यां

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More