Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या सोशल मिडिया एक्स वरती एक व्हिडिओ शेअर केला आहे. अजित पवार (Ajit Pawar) दादागिरी करत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडिओ शेअर करताना केला आहे. त्या व्हिडिओमुळे सध्या राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
हा व्हिडिओ श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यातील असल्याचा दावाही जितेंद्र आव्हाडांकडून केला गेला आहे. इथ जरी कुणाचही युनिट असलं तरी पुढं चालवायचं की नाय चालवायचं याबाबत मी बरंच काही करू शकतो, असं अजित पवार म्हणाल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
अजित पवारांची दादागिरी?
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही लोकांसोबत बैठक घेत आहेत, त्यावेळी ते कारखान्याचा उल्लेख करत आहेत.
मला तुमची साथ हवी आहे. कुणाच्या दबावाला घाबरायची गरज नाही. आधी रामराजे यांचं ऐकलं आता माझं ऐकावं अशी विनंती आहे. इथ जरी कुणाचही युनिट असलं तरी पुढं चालवायचं की नाय चालवायचं ह्याबाबत मी बरच काही करू शकतो…. बोला… दबाव आहे का तुमच्यावर?, असा सवाल अजित पवारांनी विचारल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केला आहे.
“मी जर काही गंमत करायची ठरवली तर”
मला बरंच काही करता आलं असतं. कुणी म्हणत होतं धारूने नाही अजित पवारने कारखाना घेतला. शेजारी असणारा शरयू कारखाना माझ्या बंधूने घेतला. त्यावेळीं ह्या कारखान्याबाबत माझ्याकडे सुद्धा ऑफर आली होती. त्यावेळी सगळं काही झालं होतं परंतु माझ्या माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्याच याच परिसरात युनिट असल्यामुळे मी काही केलं नाहीं. परंतु आता मी जर काही गंमत करायची ठरवली तर खूप काही करू शकतो. परत तुम्ही रडत माझ्याकडे याल, असंही अजित पवार म्हणाले.
*अजित पवारांची
दादागिरी नही चलेगी नही चलेगी*(सदर व्हिडिओ श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यातील असल्याची सूत्रांची माहिती)*
मला तुमची साथ हवी आहे. कुणाच्या दबावाला घाबरायची गरज नाही. आधी रामराजे यांचं ऐकलं आता माझं ऐकावं अशी विनंती आहे. *इथ जरी कुणाचही युनिट असलं… pic.twitter.com/8oUK3MZQOv
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 10, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
लाडकी बहिण आणि शेतकऱ्यांसाठी सरकारकडून सर्वात मोठी घोषणा!
महायुतीचं सरकार आल्यावर मुख्यमंत्री कोण?; अमित शहांनी अखेर सांगूनच टाकलं
‘माझं आणि हार्दिकचं अजूनही…’; घटस्फोटानंतर नताशाकडून नवा खुलासा
‘महिलेला खोलीत आणलं, माझे कपडे काढले’; आमदाराच्या मुलासोबत घडला भयंकर प्रकार
2025 पर्यंत ‘या’ राशींच्या लोकांना मिळेल चिक्कार पैसा!