बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

समय समय की बात हैं, ज्यांना नागपुरातून बाहेर जा सांगितलं, त्यांना परत येण्यासाठी आर्जव!

नागपूर | तुकाराम मुंढे यांच्यासारखे खमके अधिकारी असल्याशिवाय सरकारी अधिकारी सुधारणार नाहीत, असं म्हणत काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांनी
तुकाराम मुंढे यांना पुन्हा नागपुरात आणा, अशी मागणी केली आहे.

मुंढे यांना बोलवा म्हणत बंटी शेळके यांनी विभागीय कार्यालयात प्रचंड गोंधळ घातला. बंटी शेळके यांनी विभागीय आयुक्त घातलेल्या या गोंधळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आमदार अभिजित वंजारीही उपस्थित होते.

नागपुरात कोरोनाचं थैमान सुरू असताना तुकाराम मुंढे यांनी अतिशय कडक निर्बंध लावले होते. यावरून महापौर संदीप जोशी आणि तुकाराम मुंढे यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली होती. जून महिन्यात त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. भाजपचे महापालिकेतील सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी हे आवाज चढवून सभेत आयुक्तांसोबत बोलत होते. जर अशाच अविर्भावात भाजपचे नगरसेवक बोलणार असतील, तर मी सभेतून निघून जाईन, असं मुंढेंनी ठणकावलं होतं. यावर सभागृहातूनच काय नागपुरातूनही चालते व्हा, असं दयाशंकर तिवारी म्हणाले होते. यानंतर सारख्या होणाऱ्या या वादामुळे मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून मुंढे यांची बदली करण्यात आली.

दरम्यान, याआधी नागपूरातील कोरोनाची स्थिती पाहता मुंढेची पुन्हा नागपूरात बदली करावी, अशी मागणी शिवसेनेनं केली होती. तुकाराम मुंढे यांची पुन्हा नागपूरात बदली करावी यासंदर्भात शिवसेनेचे नागपूर उपजिल्हाप्रमुख आणि नगरसेवक किशोर कुमेरिया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं.

 

थोडक्यात बातम्या- 

मी माझं आयुष्य जगलो म्हणत तरुणाला स्वत:चा बेड देणाऱ्या 85 वर्षीय वृद्धाचं निधन

बायकोच्या प्रियकराबद्दल कळल्यानंतर त्याने उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

‘मोक्का’ लागलेल्या महिला वकिलाची ससूनच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

कोव्हिड केअर सेंटरमध्ये महिला डाॅक्टरकडे केली शरीरसुखाची मागणी; आरोपीला अटक

बारावीच्या परीक्षांबाबत राज्य शासनाचा ‘हा’ मोठा निर्णय 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More