Top News

‘बर्गरकिंग’चे शेअर्स घेतलेले गुंतवणूकदार तीनच दिवसात बक्कळ मालामाल!

बर्गर किंगच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 3 दिवसांमध्ये तिप्पट नफा झालाय. बर्गर किंगच्या शेअर्समध्ये बुधवारी पुन्हा 20 टक्क्यांचं अपर सर्किट लावलं होतं. यामुळे बर्गर किंगच्या शेअर्सचा दर 199 रूपयांवर जाऊन पोहोचला.

दरम्यान मंगळवारी देखील बर्गर किंगच्या शेअर्समध्ये अपर सर्किट लावण्यात आले होतं. त्यावेळी बर्गर किंगचा शेअर 166 रूपयांवर गेला होता.

सोमवारी बर्गर किंगने शेअर बाजारात 92 टक्के प्रिमिअमने सुरुवात केली. त्यावेळी जेव्हा बर्गर किंगचा आयपीओ लिस्ट झाला तेव्हा कंपनीचं मार्केट कॅप 4460 कोटी रूपये होतं. बर्गर किंगच्या शेअरची इश्यू प्राईज 60 रूपये इतकी होती. परंतु त्यामध्ये 55 रूपयांनी वाढ होऊ शेअर 115 रूपयांवर लिस्ट झाला.

बर्गर किंगच्या शेअर्सची इश्यू प्राईज ही 60 रूपये होती. अशामध्ये गुंतवणुकदारांना इश्यू प्राईजपासून 232 टक्के नफा अद्याप मिळालाय.

थोडक्यात बातम्या-

“नव्या कृषी कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार”

भाजप सोडून परत या, तिन्ही पक्ष मिळून निवडून आणू- अजित पवार

फेक टीआरपीप्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानी यांना जामीन

…तर हे केंद्र सरकाराच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही- बाबा आढाव

विराट-पुजारासाठी नाही तर ‘या’ खेळाडूसाठी केलाय गेमप्लॅन- टीप पेन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या