बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बर्गर, पिझ्झा, स्मार्टफोनची होम डिलिव्हिरी होऊ शकते, तर मग राशनची का नाही?”

नवी दिल्ली | गेल्या काही वर्षांपासून दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात वाद होताना दिसत होते. दिल्ली सरकारच्या कामात केंद्र सरकार ढवळाढवळ करत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीनं केला होता. त्यानंतर आता पुन्हा या दोन सरकारमधला वाद वाढलेला दिसत आहे. गरीब कुटूंबांना दिलं जाणाऱ्या राशनवरून ही दोन सरकारं आमने-सामने आली आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. योजनेवर बंदी घालून तुम्हाला रेशन माफियांना मदत करायची आहे. केंद्र सरकारचं हे काम चुकीचं आहे. तुम्ही रेशन माफियासोबत असाल तर मग गरींबाच्या पाठीशी कोण उभं राहणार?, असा प्रश्न केजरीवाल यांनी केला आहे.

देशात पिझ्झा, बर्गर आणि स्मार्टफोनची होम डिलिवरी होते. तर मग रेशनची का होऊ शकत नाही? असा सवाल केजरीवाल यांनी केला. केंद्र सरकारकडून आम्ही 5 वेळा परवानगी घेतली होती दिल्लीत पुढच्या आठवड्यापासून घरपोच रेशन पोहोचवलं जाणार होतं. संपूर्ण तयारी झाली होती. पण केंद्राने अचानक ही योजना का रोखली?, असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी 15 मे रोजी कॅबिनेटीची बैठक घेतली होती. ज्यात मोफत रेशन योजनेचा निर्णय घेण्यात आला होता. 72 लाख नागरिकांपर्यंत हे रेशन घरपोच देण्याची योजना होती. यानुसार प्रत्येक कुटुंबाला 10 किलो रेशन मोफत देण्यात येणार होतं. पण आता केंद्र सरकारने याला मंजुरी न दिल्यानं दिल्ली सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

आपापल्या भागातील परिस्थितीनुसार जिल्हा प्रशासनाने निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा- उद्धव ठाकरे

दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येतही घट, जाणुन घ्या आकडेवारी

‘या’ जिल्ह्यात 2 आठवड्यात कोरोना रुग्णांची तब्बल 13 कोटींची लूट; तपासणीत धक्कादायक माहिती आली समोर

महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यात मान्सूनचं जोरदार आगमन

दिलासादायक! मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More