बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अबब! प्रियांकाच्या अमेरिकेतील रेस्टॉरंटमधील मुंबई वडापावची किंमत ऐकून थक्क व्हाल

मुंबई | बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजेच अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. बाॅलिवूडच नव्हे तर हाॅलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडणारी प्रियांका सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. प्रियांकानं काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत भारतीय रेस्टॉरंट सुरु केलं. तिच्या या रेस्टॉरंटचे नाव ‘सोना’ असून या रेस्टॉरंटमध्ये भारतातील लोकप्रिय पदार्थांची चव चाखायला मिळत असते. अशातच या रेस्टॉरंटमधील एका मेन्यूचा सगळीकडेच बोलबाला होताना दिसत आहे. हा पदार्थ म्हणजे ‘मुंबईचा वडापाव’.

‘मुंबईचा वडापाव’ म्हटलं की एक जिव्हाळ्याचा पदार्थ. वडापावचं नाव जरी काढलं तरी कोणाच्याही तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही. मात्र आता याच वडापावची न्यूयॉर्कमधील किंमत ऐकून तुमच्या तोंडचं पाणी पळून गेल्याशिवाय राहणार नाही. प्रियांकाच्या न्यूयाॅर्कमधील या रेस्टॉरंटमध्ये एक वडापावची किंमत ही 14 युएस डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात जवळपास एक हजार रुपये इतकी आहे. त्यामुळे मुंबईकरांचा लोकप्रिय वडापाव आता न्यूयॉर्कमध्येही आपला जलवा दाखवतोय, असं म्हणायला काही हरकत नाही.

लोकप्रिय निर्मात्या आणि थिएटरसाठी ओळखल्या जाणाऱ्या लोला जेम्स यांनी देखील नुकतीच प्रियांकाच्या सोना या रेस्टॉरंटला भेट दिली होती. यावेळी त्यांनी आपल्या मुंबईचा जीव असलेला पदार्थ वडापावची चव चाखली. याशिवाय लोलानं भेळ, चाट आणि बरेच पदार्थ खाल्ले. या विषयी सांगत लोलानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअरही केले.

दरम्यान, हे फोटो शेअर करत लोला जेम्सनं म्हटलं की, यात आश्चर्य नाही न्यूयॉर्कमध्ये असलेलं हे सोना अप्रतिम आहे. या रुचकर आणि चविष्ट जेवणाकडे एकदा नजर टाका. प्रियांका चोप्राच्या या रेस्टॉरंटमध्ये आत्तापर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. प्रियांकाचं सोना हे नेहमीच भारतीय मेन्यूमुळे चर्चेत असलेलं पाहायला मिळतं.

vadapav

थोडक्यात बातम्या –

मी चुकीचा होतो तर, केंद्रावर ही वेळ का आली?- अशोक चव्हाण

“चित्रा वाघ यांना शिवसेनेत यायचं होतं पण शिवसेनेनं प्रवेश नाकारला, त्यामुळे त्या…”

‘या’ विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या नाकात 1000 पटीनं अधिक व्हायरस, संशोधनातून नवी माहिती समोर

“मनसे असो वा राष्ट्रवादी, भाजप युती करणारच नाही”

“संसदेतील गोंधळाचं खापर विरोधकांवर फोडून तुमच्या त्या लोकशाहीचं श्राद्धच घाला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More