बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वर्षभराचा चारा जळून खाक, कृषी पदवीधर युवाशक्तीचा शेतकऱ्याला मदतीचा हात!

औरंगाबाद | पाटोदा तालुक्यातील नाळवंडी गावातील सामान्य शेतकरी वासुदेव साळुंके यांच्या शेतातील गोठ्यात काही दिवसांपूर्वी शॉटसर्किटमुळे आग लागुन जनावरांच्या वर्षभराच्या चाऱ्यासह इतर महत्वाचं साहित्य जळून खाक झालं होतं. याची माहिती नुकसानग्रस्त शेतकरी साळुंके यांचे चिरंजीव आणि कृषी पदवीधर संघटनेचे सक्रिय सदस्य शिवाजी सोळुंके यांनी संबंधित घटना कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे संस्थापक सदस्य आणि राज्यकार्याध्यक्ष प्रवीण आजबे यांना कळवली.

त्यानंतर त्यांनी त्वरित कृषी पदवीधर संघटनेच्या वतीनं आवाहन करत संघटनेच्या वतीने 800 चाऱ्याच्या पेंढ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला थेट दावणीला सुपूर्त करत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यावर साळुंके कुटुंबियांनी समाधान व्यक्त केलं आहे.

कृषी पदवीधर संघटना हि शेतकरी कुटुंबातील सदस्यांसाठी शैक्षणिक बाबींसह त्यांच्या संकटाच्या काळात खंबीरपणे उभा रहात असल्याचा प्रत्यय इथं आला आहे. संघटनेचे संस्थापक जयदीप ननावरे, सचिव मनजीत लाड, संघटक श्रीकांत राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्य कार्याध्यक्ष प्रवीण आजबे यांच्या विशेष प्रयत्नांतून हि मदत देता आल्याबाबत शेतकरी आणि गावकऱ्यांनी संघटनेचे आभार व्यक्त केले आहेत.

दरम्यान, कृषी पदवीधर युवाशक्तीचे जिल्हातील जेष्ठ सदस्य अजित पवार, बीड तालुका अध्यक्ष संदेश बहिर, तालुका कार्याध्यक्ष प्रदीप आगाम, पाटोदा तालुका सोशल मीडियाचे अध्यक्ष शिवाजी साळुंके आणि कृषी पदवीधर बळीराम पांढरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या- 

लस द्यायला आलं पथक, आज्जीबाईचा चढला पारा, व्हिडीओ जोरदार व्हायरल

बाॅलिवूडवर शोककळा! ‘इंदू की जवानी’ चित्रपटाच्या निर्मात्यांचं कोरोनानं निधन

“शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी मी अस्पृश्य, पण संभाजीराजेंबरोबर जायला तयार”

“ठाकरे सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध, त्यामुळे आरक्षण गेले”

पावसाळ्यात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांचं डाॅक्टरांना आवाहन म्हणाले….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More