Top News देश

धक्कादायक! गावकऱ्यांनी जळता टायर कानावर फेकत हत्तीला पेटवलं

तामिळनाडू | माणुसकील काळीमा फासणारी घटना तामिळनाडूमधील मसिनागुडी गावात घडली आहे. या गावातील गावकऱ्यांनी एका हत्तीच्या गळ्यात पेटलेला टायर टाकला. हत्ती यामुळे भाजून निघाला. त्यानंतर जखमी झालेल्या हत्तीला उपचारासाठी नेताना त्याचा मृत्यु झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की गावकऱ्यांनी हत्तीला पळवण्यासाठी अविचारी कृत्य केलं आहे. त्यांनी हत्तीच्या गळ्यात झळका टायर टाकला तो टायर हत्तीच्या कानात अडकला. त्यानंतर हत्ती सैरवैरा पळू लागला.

जळता टायर कानात अडकल्याने त्यामध्ये हत्ती अक्षरक्ष: होरपळून निघाला. या आगीत हत्तीची पाठ आणि कान संपुर्ण जळून गेलं होतं.  19 जानेवारीला वैद्यकीय उपचारासाठी हत्तीला नेले जात असताना त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, लोकांनी असं कृत्य करण्याएवजी वनविभागासोबत संपर्क साधायल हवा होता. प्राण्यांना हानी पोहोचेल असं कोणतंही कृत्य करू नये. व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे जळत असलेल्या हत्तीची अवस्था पाहून हळहळ व्यक्त होत आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

नोटाबंदीनंतर चलनातील या महत्वाच्या नोटा होणार बंद??; RBI ची महत्वाची माहिती

‘तू नसल्याने आता गोष्टी पूर्वीसारख्या नसतील…’; जसप्रीत बुमराह झाला भावूक!

‘आई बहिणीवरून त्यांनी वडिलांना शिव्या दिल्या पण…’; वडिलांच्या आठवणीत भरत जाधवची भावूक पोस्ट

प्रवरा ग्रामीण आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या कुलपती पदी डॉक्टर राजेंद्र विखे पाटील

एअरहॉस्टेस गँगरेप आणि हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, ही धक्कादायक माहिती आली समोर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या