बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उत्तराखंडमध्ये शाळेची बस दरीत कोसळून मोठा अपघात!

देहरादून | उत्तराखंडमध्ये शाळेची बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात तिहरी गडवालच्या कनसाळी येथे झाल्याचं कळतंय.

घटनास्थळी एनडीआरएफचे पथक दाखल झालं असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या अपघातात आत्तापर्यंत 9 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचं समजतंय.

बसमध्ये एकूण 18 विद्यार्थी असल्याची माहिती समोर आहे. या अपघातात विद्यार्थ्यांच्या हाताला, पायाला आणि चेहऱ्यावर गंभीर जखम झाली असून मुलांवर सध्या उपचार चालू आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-अयोध्येतील राम मंदिर प्रश्नी सुप्रीम कोर्टात आजपासून मुख्य सुनावणी!

-…अन् राज्यसभेतच मोदींनी अमित शहांची पाठ थोपटली!

-कलम 370 हटवल्यानंतर राज ठाकरेंनी केलं नरेंद्र मोदींचं कौतुक

-भाजप खासदार म्हणतो, “मोदी म्हणजे दुसरे शिवाजी महाराज”

-…आणि मुख्यमंत्रीपदही भाजपकडेच असेल- चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More