Top News

धुळ्यात एसटी कंटेनरवर धडकून भीषण अपघात; 10 जणांचा मृत्यू

औरंगाबाद | धुळे जिल्ह्यातील निमगुळ गावाजवळ काल (रविवार) रात्री एसटी मालवाहू कंटेनरवर धडकून भीषण अपघात झाला आहे. ही धडक इतकी जबरदस्त होती की बसची अर्धी बाजू कापली गेली आहे.

अपघातामध्ये 10 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं कळतंय. तर 30 जण जखमी असल्याची माहिती आहे. या भीषण अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सर्व जखमी प्रवाशांवर धुळ्यातील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर बसचा काही भाग कंटेनरमध्ये शिरल्यामुळे दो क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त बस आणि कंटेनर बाजूला करण्यात आलं. त्यानंतर अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे.

दरम्यान, जखमींमधील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कोहिनूर प्रकरणी राज ठाकरेंना ईडीची नोटीस; चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश!

-अरूण जेटलींची प्रकृती चिंताजनक; महत्वाचे नेते एम्समध्ये

-उद्यापासून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचा पूरग्रस्त भागाचा दौरा!

-गोपीचंद पडळकर ‘या’ मतदारसंघातून विधानसभा लढणार???

-समाजसुधारक म्हणून पंतप्रधान मोदी ओळखले जातील- अमित शहा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या