Top News

कोरोनामुळे जगभरातील उद्योग बुडाले मात्र ‘या’ तीन उद्योजकांची चांदी

मुंबई | लॉकडाऊनमध्ये दुकानं, उद्योग सर्व बंद आहेत. त्यामुळे अनेक छोट्या-मोठ्या उद्योजकांना तोटा होत आहे. पण लॉकडाऊन दरम्यान जगभरातील असे काही उद्योजक आहेत. त्यांना उद्योगामध्ये मोठा फायदा होत असल्याचं समोर आलं आहे.

लॉकडाऊनमध्येही फायदा होत असलेल्या उद्योजकांमध्ये अ‌ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बझोस, झूम अ‌ॅपचे मालक अ‌ॅरिक युआन आणि टेस्लाचे प्रमुख अ‌ॅलन मस्क यांचा समावेश आहे. या तीन उद्योजकांना लॉकडाऊनमध्ये तब्बल अरब डॉलरचा फायदा झाला आहे.

जेफ बेझोस यांच्या संपत्तीमध्ये लॉकडाऊनच्या काळात मोठी वाढ झाली आहे. झूम अ‌ॅपचे मालक अ‌ॅरिक युआन यांच्या संपत्तीमध्ये लॉकडाऊन दरम्यान मोठी वाढ झाली आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक देशांना व्हेंटिलेटरची गरज पडत आहे. अशावेळी फोर्ड मोटर्स, जनरल इलेक्ट्रॉनिक्स आणि टेस्लासारख्या कंपन्या व्हेंटिलेटर तयार करुन रुग्णालयाला देत आहेत. त्यामुळे 1 जानेवारी ते 10 एप्रिलपर्यंत टेस्लाचे प्रमुख अ‌ॅलन मस्क यांच्या इनकममध्ये 1 अरब डॉलरची वाढ झाली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पॅरोलवर बाहेर आलेल्या कुख्यात डॉन अरुण गवळीची गरजूंना मदत, पाहा व्हिडीओ

‘भारतीय मनाने कणखर असून त्यांचं मनोबलच कोरोनावर मात करेल’; चीनमधील तज्ञांकडून कौतुक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या