नागपुरात भाजपला धक्का; व्यापारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षाचा राष्ट्रवादीत प्रवेश

नागपूर | आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजपला नागपुरमध्ये जोरदार धक्का बसला अाहे. व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनराज फुसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धनराज फुसे यांनी आज राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. तसंच नागपूर काँग्रेससोबत आघाडीबाबत निर्णय झाला नसून 50-50 चा प्रस्ताव अजून पाठवला नाही, असं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं. 

दरम्यान, शिवसेनेवर आता विश्वास राहिला नाही, ते भाजपच्या सावलीखाली टिकून आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

-महाराष्ट्रात मुली पळवण्याचा प्रकार घडला तर पहिला गुन्हा राम कदमांवर नोंदवा!

-आमने सामने भेटूया; राम कदमांना तरूणीनेनं दिलं चॅलेंज

-…हा तर मोदींचा पांचटपणा; शिवसेनेचा मोदींवर हल्लाबोल

-…फक्त राम कदमच नाही तर मुख्यमंत्र्यांनीही माफी मागावी- धनंजय मुंडे

-‘वाह रे भाजप सरकार, वाह रे मुख्यमंत्री तुमचा आमदार…’; मनसेची पोस्टरबाजी

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या