बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘गाडी विकून जे पैसे येतील ते आईला द्या, तिची काळजी घ्या’; खडकवासला धरणात उडी घेत व्यावसायिकाची आत्महत्या

पुणे | खडकवासला धरणात उडी मारून एका तरूण व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रशेखर गोपाळ पुजारी असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. चंद्रशेखर यांचा सोमवार पेठ येथे हातगाडीवर वडापाव आणि डोसा विक्रीचा व्यवसाय होता.

चंद्रशेखरने पुणे-पानशेत रस्त्याला लागून खडकवासला धरणाच्या भिंतीजवळ पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली. तसेच चंद्रशेखर पुजारी याने आत्महत्येपूर्वी एक व्हॉइस मेसेज आपल्या चुलत भावाला पाठवला होता.

या व्हॉइस मेसेजमध्ये माझी गाडी खडकवासला धरणाजवळ लावलेली आहे. मी आत्महत्या करत असून गाडी विकून जे पैसे येतील ते माझ्या आईला द्या, तसेच माझ्या आईची काळजी घ्या, असं चंद्रशेखर पुजारीने म्हटलंय. व्हॉईस मेसेज मिळाल्यानंतर चुलत भाऊ व नातेवाईकांनी तातडीने खडकवासला येथे येऊन शोधाशोध केली असता चंद्रशेखर पुजारी याची दुचाकी आढळून आली.

शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास या तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे- पाटील, पोलीस हवालदार रामदास बाबर, दिलीप गायकवाड यांनी घटनास्थळी पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. मात्र आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट समजू शकलं नाही.

थोडक्यात बातम्या- 

“बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला”

‘हॉटेल, पर्यटन व्यावसायिकांना मदत करा’; शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्रातील ‘या’ गावाचा घ्यावा सर्वांनी आदर्श, एकालाही नाही झाली कोरोनाची लागण

सिस्टम नव्हे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व फेल झालं- सोनिया गांधी

मोठी बातमी! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात आणखी तीन दिवसांचा लॉकडाउन वाढवला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More