बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…पण भाजपला हे मान्य आहे का?’ मोहन भागवतांचं कौतुक करत शिवसेनेचे भाजपला चिमटे

मुंबई | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतंच हिंदु- मुस्लिमांमध्ये मतभेद नाहीत. स्वत:ला हिंदू नाही तर भारतीय म्हणा, सगळ्यांचा DNA एकच आहे, असं वक्तव्य केलं आहे. भागवतांच्या या वक्तव्यानंतर अनेक बड्या नेत्यांनी मोहन भागवतांवर टीका केली आहे. अशातच आता शिवसेनेने मात्र अग्रलेखाच्या माध्यमातून मोहन भागवत यांच्या वक्तव्यांचं कौतुक केलं आहे. तर शिवसेनेने भाजपवर टोमणे देखील मारले आहेत.

गेल्या काही वर्षांत हिंदुत्वाच्या नावावर जे झुंडबळी देशभरात गेले, त्यावर सरसंघचालकांनी नाराजी व्यक्त केली. असे झुंडबळी हिंदुत्व संकल्पनेत बसत नाहीत असं मोहन भागवत म्हणतात. पण हे भाजपला मान्य आहे काय? असा सवाल शिवसेनेने सामनातून विचारला गेला आहे. धर्माच्या नावावर अतिरेकी झुंडशाही व झुंडबळी म्हणजे विकासाला खोडा आहे, सरसंघचालकांना असं वक्तव्य करावं लागलं, यापाठीमागे काही संदेश आहे का?, असंही शिवसेनेने विचारलं आहे.

हिंदुस्थानात मुस्लिम व्यक्ती राहू शकत नाही असे एखादा हिंदू म्हणत असेल तर तो हिंदू नाही. त्यावर आता राष्ट्रीय चर्चा व्हायला हरकत नाही. मुळात असे काय घडले की, सरसंघचालकांना मुसलमानांना त्यांच्या डीएनएची आठवण करून द्यावी लागली, असं सुचक वक्तव्य देखील अग्रलेखातून करण्यात आलं आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या दारूण पराभवावर सरसंघचालकांनी भाष्य केल्याचं सांगण्यात येत आहे.

निवडणूक राज्याची असो नाहीतर देशाची, दंगली, उन्माद, धार्मिक फाळणी, धर्मद्वेष हाच त्यांचा निवडणुका जिंकण्याचा अजेंडा राहिलाय. पण हा उन्माद पश्चिम बंगालात अजिबात चालला नाही. किंबहुना केरळातही भाजप स्टाईल हिंदुत्व लोकांनी स्वीकारलं नाही. लोकांना धर्माचं राजकारण नको आहे. त्यांचेच राजकीय अंग असलेल्या भारतीय जनता पक्षाने हे स्वीकारले आहे का?, अशी टीका शिवसेनेने भाजपवर केली आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्य सरकारविरोधात भाजपचे 12 निलंबित आमदार मागणार न्यायालयात दाद!

निलंबित 12 आमदारांची राजभवनाकडे धाव; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भेटीत काय झालं?

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘संभाजी भिडे’ यांच्यावर गुन्हा दाखल

मोठी बातमी! दहावी, बारावीच्या परीक्षा आता वर्षातून दोनवेळा होणार!

खासदार नारायण राणेंना दिल्लीतून तातडीने बोलावणं; केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राणेंना स्थान?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More