Top News महाराष्ट्र मुंबई

“संजय राऊतांची राज्याबाहेर जाऊन लाज घालवायची सवय जात नाही”

मुंबई | सध्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय रणधुमाळी सुरु आहे. अशातच रविवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनापश्चिम बंगालच्या निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा केली. यावरुन माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

यासंदर्भात निलेश राणे यांनी ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणाले की, “महाराष्ट्रात शिवसेनेला २०१९ मध्ये युती करून सुद्धा फक्त १६% मतं मिळाली पण संजय राऊत यांची राज्याबाहेर जाऊन लाज घालवायची सवय जात नाही.”

राणेंनी शिवसेनेनं ज्या-ज्या ठिकाणी निवडणुका लढवलेल्या त्या ठिकाणची आकडेवारीदेखील मांडली आहे. ‘बिहार निवडणुक – नोटा 1.68%, शिवसेनेला 0.05% मतं, गोवा निवडणुक – शिवसेनेनं 40 पैकी फक्त 3 उमेदवार उभे केले आणि त्या 3 उमेदवारांची एकूण मतं 792’.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेअंती पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. आम्ही लवकरच कोलकात्यात दाखल होऊ. जय हिंद, जय बांगला, असं ट्विट संजय राऊतांनी केलं होतं.


थोडक्यात बातम्या-

चंद्रकांत पाटलांच्या गावात भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत केली आघाडी तरीही सेनेने भगवा फडकलाच

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ठरले आहेत”

अजित पवार साहेब, जे जमणार नाही ते बोलू नका, कारण… -निलेश राणे

“धनंजय मुंडेंबाबत विरोधकांनी राजकारण करु नये”

ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर! कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादीला धक्का

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या