बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…पण केंद्राचा त्यांच्यावर दबाव आहे’; संजय राऊतांचा राज्यपालांना खोचक टोला

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thcakrey) यांच्या पत्रावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh KoshyarI) यांनी नाराजी व्यक्त करणारं पत्र पाठवलं होतं. मुख्यमंत्र्याच्या पत्रातील भाषेमुळे मला खुप दु:ख झाल्याची भावना राज्यपालांनी व्यक्त केली होती. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut) यांनी राज्यपालांना त्यांच्याच पत्रावरून टोला लगावला आहे.

‘सततच्या दबावामुळे राज्यपाल दु:खी आहेत. त्यांच्या वेदनेत आमच्यासह महाराष्ट्राची साडेअकरा कोटी जनता सहभागी आहे. केंद्राला विनंती आहे की, राज्यपालांवर दबाव आणून सरकारच्या शिफारसी दडवून ठेवणं बंद करावं, हे राज्यपालांना कुठं तरी दुखतंय-टोचतंय. त्यांच्यावर कुठेतरी केंद्राचा दबाव आहे,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

‘दुसरा विषय अध्यक्षपदाचा आम्ही परवानगी मागितली. त्यांनी नाकारली. यात दबाव कुठेय. दबाव केंद्राचा आहे, असा दावा त्यांनी केला. आमच्याविषयी त्यांची नाराजी असण्याचं कारण नाही. ते आमचे पालक आहेत. आमच्यावर त्यांनी कशाविषयी नाराजी व्यक्त करावी. राज्यपालांच्या मनात 12 आमदारांच्या नियुक्ती करण्याचं आहे पण केंद्राचा त्यांच्यावर दबाव आहे’ असंही राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यपालांनी अध्यक्ष निवडीवरून पाठवलेल्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी कठोर भाषेत उत्तर दिलं होतं. त्यावर राज्यपालांनी मुख्यमंत्र्याच्या पत्रातील भाषेवर नाराजी व्यक्त केली होती. “तुमच्या पत्राचा असयंमी टोन आणि धमकावणारा सुर पाहून मी खूप वैयक्तिक खूप दु:खी झालो आहे,” असं राज्यपालांनी पत्रात म्हटलं होतं. त्यावरून राऊतांनी टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या-

इंधन दरात काय बदल झाला?; वाचा पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

Omicronच्या पहिल्या लक्षणाचा प्रसार होण्यापहिलेच व्हा सावधान, तज्ज्ञांचा गंभीर इशारा

कमी वयात कोट्याधीश बनलेली उद्योजिका पंखुरी श्रीवास्तव हिचं निधन

“15 लाखांच्या भ्रष्टाचाराला मी भ्रष्टाचार मानत नाही,” भाजप खासदाराच्या ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

मोठी बातमी : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता दिल्लीत ‘यलो अलर्ट’ जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More