“…तर माझ्या आयुष्याचा शेवट चांगला होणार नाही”

सातारा : शरद पवारांना दुखावलं तर माझ्या आयुष्याचा शेवट चांगला होणार नाही पण शरद पवारांना दुखावलं नाही तर समोरच्या हजारो लोकांचं आयुष्य चांगलं होणार नाही, असं रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी सोडण्याची मनाची तयारी आहे, पण युतीचं काय होतं ते पाहून निर्णय घेणार, असं सूचक वक्तव्य रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलं आहे. ते फलटण मध्ये कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

उदयनराजे यांचा भाजपप्रवेश निश्चित झाल्यानंतर रामराजे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र आपण अजूनही राष्ट्रवादीतच आहोत. उद्याचं उद्या पाहू म्हणत रामराजेंनी सावध पवित्रा घेतला.

पक्षात कुठल्या जायचं, पक्ष सोडायचा की नाही याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार तुम्ही मला दिलेला आहे. पण तरूण पिढीसाठी आपल्याला हे करावं लागणार आहे, असं रामराजेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Shivsena