मुंबई | मनसे पक्षाच्या 15 व्या वर्धापण दिनी मेळावा आणि त्यात होणारं राज ठाकरे यांचं मार्गदर्शन यावर्षी कोरोनामुळे होऊ शकलं नाही. त्यामुळे आजच्या दिवशी राज ठाकरेंनी पदाधिकारी, कार्यकर्ते यांना शुभेच्छा आणि मार्गदर्शन करण्यासाठी डिजीटल प्लॅटफाॅर्मचा वापर केला आहे. त्यांनी एक ऑडिओ मॅसेज पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना पाठवला. या ऑडिओ मॅसेज मध्ये राज ठाकरे यांनी येणाऱ्या काळात पक्षाला भरभरून यश मिळेल असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.
मनसेच्या 15 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत राज ठाकरे म्हणाले की, ” 19 मार्च 2006 ला पक्षाची स्थापना केली. 15 वर्षापूर्वी एका ध्येयाने बाहेर पडून पक्षाची स्थापना केली. त्यावेळी मनात धाकधूक होती. महाराष्ट्रासाठी काहीतरी नवीन करण्याची केलेली धडपड तुम्ही आणि लोकं हे कसं स्वीकारणार याची शंका होती. मात्र त्या दिवशी शिवाजी पार्कमधली सभा आणि समोर असलेला अलोट जनसागर पाहिला आणि मनातील सर्व शंका दूर झाल्या. आपण एकत्र पाहिलेल्या स्वप्नाला आज 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. आपल्यातील काहीजण सोडून गेले, पण तुम्ही सह्याद्रीच्या कड्यासारखे टणक राहीलात.”
आपल्या पक्षाला भविष्यात जे काही यश मिळेल ते तुमच्यामुळेच असेल. तुमच्या हातून जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणार असं वचन राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलं आहे. तसच ते म्हणाले की, “आपण निवडणुकीत यश पाहिलं, पराभव पाहिला. पण या पराभवानंतरही तुमच्या मनातील लढण्याची उर्मी कमी झाली नाही याचा मला खरोखरच अभिमान वाटतोय. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाला जेव्हा असं वाटतं की आपला प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण पक्षच सोडवू शकतो त्यावेळी यातच भविष्याच्या यशाची बीजं रोवली आहेत हे विसरू नका. तुमचे श्रम वाया जाणार नाही हे नक्की.”
आपला प्रवास खडतर आहे, पण गरुड भरारी घेण्याची शक्ती तुमच्या सदिच्छांमुळे आपल्या पंखात आली आहे आणि त्याच्या जोरावर आपण सर्व आव्हान पेलू असाही विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला. राज ठाकरे म्हणाले की, “कोरोनाच्या परिस्थितीमुळे हा पहिलाच वर्धापन दिन आहे आपण भेटू शकत नाही. सध्याची परिस्थिती पाहता गर्दी टाळणे आवश्यक आहे, तुम्हाला भेटता येणार नाही त्यामुळे हा रेकॉर्डेड संदेश तयार केला आहे. ही परिस्थिती निवळली की आपण भेटणार हे नक्की.”
माझ्या तमाम बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…#मनसेवर्धापनदिन #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रप्रथम #राजठाकरे #महाराष्ट्रसैनिक #राजसंवादhttps://t.co/bXKqZQyuqg
— Raj Thackeray (@RajThackeray) March 9, 2021
थोडक्यात बातम्या –
अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्यावर रोहित पवारांचं ट्विट; म्हणाले…
“अध्यक्ष महोदय मी दुखावलो गेलोय, राहुल गांधीना शाळेत पाठवण्यात यावं”
पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्यावर अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांचं मोठं वक्तव्य!
…अन् भरबैठकीत नाना पटोले संतापले; ‘या’ मुद्द्यावरून शिवसेना-राष्ट्रवादीवर व्यक्त केली नाराजी
सख्खे भाऊ पक्के वैरी; आई-वडिलांसमोरच लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या
Comments are closed.