बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…पण ठाकरे सरकारने विश्वासघात केला’; भाजपची घणाघाती टीका

मुंबई | सध्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात राजकारण तापताना दिसत आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जोपर्यंत मार्गी लागत नाही, तोपर्यंत निवडणुका होऊ नये, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. मात्र, राज्यांना निवडणुका पुढे ढकलता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं होतं. त्यावरून आता भाजपने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

ओबीसी आरक्षणाशिवाय अखेर 5 जिल्ह्यातील निवडणुका जाहीर झाल्यानं राज्य सरकारने ओबीसी समाजाचा मोठा विश्वासघात केला आहे. सरकारने ठरवलं असतं तर या निवडणुका सहज पुढे ढकलता आल्या असत्या. पण, सरकारने विश्वासघात केलाच, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

आम्ही मात्र या सर्व जागांवर ओबीसी उमेदवार देण्याची आधीच घोषणा केली आहे. कमी-अधिक यशाची पर्वा न करता भाजप केवळ आणि केवळ ओबीसींनाच उमेदवारी देणार असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आधीच जाहीर केले आहे, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वपक्षीय बैठक घेतली. त्यावेळी ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत यावर एकमत झालं होतं. त्यानंतर आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे.

थोडक्यात बातम्या-

एमपीएससीच्या मुख्य परीक्षेची तारीख ठरली; ‘या’ 6 केंद्रांवर होणार परीक्षा

“दुसऱ्यांच्या मुलांकडे बोट दाखवण्याआधी आपला मुलगा काय करतो ते पहावं”

“स्वत:ला अग्रस्थानी ठेवून नवा इतिहास लिहिण्याचा भाजपचा प्रयत्न”

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More