बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…पण हे मुंबई मॉडेल नाही, तर मृत्यूचं मॉडेल”

मुंबई |  विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन कालपासून सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून खूप राडा झाला. एवढंच नाहीतर नेत्यांमध्ये धक्काबुक्की, रेटारेटीही झाली. या प्रकारामुळे न्यायालयाने भाजपच्या 12 आमदारांना एका वर्षासाठी निलंबित केलं आहे. त्यावरून भाजपचे सर्वच नेते, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अधिवेशाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज भाजपने विधिमंडळाबाहेर पायऱ्यांवरच आंदोलन सुरू केलं.

त्याचबरोबर विधिमंडळ परिसरात प्रतिविधानसभा भरवण्यात आली. या प्रतिविधिनासभेमध्ये भाजप नेत्यांनी राज्य सरकावर एका-पाठोपाठ सडकून आरोप आणि टीका केल्या आहेत. यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लसी दिल्या म्हणून राज्यात जास्त लसीकरण झाले. मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनामुळे झालेले मृत्यू लपवण्यात आले. मुंबईत 17 हजार कोरोना मृत्यू लपवले गेले असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

मुंबई मॉडेलच्या नावाखाली पाठ थोपटवून घेण्यात आली. पण हे मुंबई मॉडेल नाही, हे मृत्यूचं मॉडेल असल्याचंही फडणवीसांनी म्हटलं आहे. तसेच या राज्यातील सरकारने पुणेसह अख्ख्या राज्याची वाट लावली असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

राज्यातील या मविआने 155 कोटी कोणत्या जाहिरातींवर खर्च केले?, असा सवालही देवेंद्र फडणीस यांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विधीमंडळात सत्ताधाऱ्यांकडून एक काळा अध्याय लिहिला गेला आहे. राज्यातील सरकारकडून लोकशाहीची हत्या सुरु असल्याचंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

हेलिकॉप्टरमधून नवरदेवासोबत खासदार अमोल कोल्हेंनी केली दमदार एन्ट्री!

‘भास्कर जाधव यांना संरक्षण देणार’; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेत ग्वाही

‘पत्रकारांवर दंडुकेशाही, विधानसभेत लोकशाहीची हत्या’; विरोधी पक्षनेते आक्रमक

“आमच्यावर बॉम्ब टाकायला निघाले होते; त्यांच्याच हातात फुटला”

भास्कर जाधव पुन्हा तालिका अध्यक्ष; प्रतिविधानसभेवर तालिका अध्यक्षांची कारवाई

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More