बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दारूसाठी काय पण! जिवाचा आटापिटा करत वाचवली दारू, व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली |  सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारे अनेक मजेशीर व्हिडीओ आपल्याला लोटपोट करून हसवतात. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील एका माणसाची डोकॅलिटी देखील असाच चर्चेचा विषय ठरत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतील एका माणसाने दारूच्या बॉटलचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण व्हावे म्हणून जबरदस्त डोकं चालवलं आहे. या माणसाने दारूचं रक्षण करण्यासाठी वापरलेलं डोकं पाहून तुम्ही देखील पोट धरून हसाल.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती रस्त्यावरून चालला आहे. मात्र, रस्त्यावर बरेच पाणी साठलं आहे. रस्त्यावर पाणी साठलेलं असताना देखील हा व्यक्ती दोन बकेटमध्ये दोन पाय ठेवून पाण्यातून जाताना दिसत आहे. सुरुवातीला हा व्यक्ती पाण्यातून असं का चालत आहे, ही गोष्ट लक्षात येत नाही. मात्र, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पोहोचल्यानंतर तो बकेटमधून बाहेर येतो आणि त्याच बकेटमधून दोन दारूच्या बॉटल्स बाहेर काढतो.

दारूचे पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी या व्यक्तीने वापरलेल्या डोकॅलिटीची लोक सोशल मीडियावर वाह वाह करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे समजू शकलं नाही. मात्र, ‘Shwetank’ नावाच्या ट्विटर अकाऊंट वरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. लोक यावर मजेशीर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

पाहा व्हिडीओ – 

थोडक्यात बातम्या – 

खाजगी रुग्णालयात कोरोना रुग्ण दाखल करून घेणार नाही; ‘या’ शहरातील खासगी रुग्णालयांचा अजब निर्णय

‘खाकी’तली माणुसकी! बेघर महिलेला पोलिसानं स्वतःच्या हातानं खाऊ घातलं

मोदींंमुळे भाजप तर बाळासाहेबांमुळे शिवसेना सत्तेत आहे – राज ठाकरे

कोरोनानं पतीचं निधन; आर्थिक संकटात असणाऱ्या तरुणीला मित्र-मैत्रिणींनी केली मोलाची मदत

नागपूरात आज आढळले फक्त 203 नवे रूग्ण; कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More