बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बटलरची खेळी विराटवर भारी; दणदणीत विजयासह इंग्लंड मालिकेत आघाडीवर

अहमदाबाद | भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या 5 टी-ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना अहमदाबादच्या नरेंद्र  मोदी स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना पाहुण्यासंघाने 8 गडी राखून जिंकला. या सामन्यात भारताकडून विराट कोहलीने तर इंग्लंडकरून जोस बटलरने आक्रमक फलंदाजी केली. बटलरच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने हा सामना सहज जिंकला.

भारताने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडला 157 धावांचं आव्हान दिलं. भारताचे सलामीचे फलंदाज झटपट बाद झाल्यावर विराटनं एक बाजू सांभाळत भारताचा डाव सावरला. त्यानं आक्रमक फलंदाजी करत 46 चेंडूत 77 धावांची खेळी केली. ही त्याची इंग्लंड विरूद्धची सर्वाधिक धावसंख्या होती. तर या सामन्यात मार्क वूडने चांगली गोलंदाजी करत 3 महत्वाचे गडी बाद केले.

त्यानंतर 158 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा सलामी फलंदाज जोस बटलर मैदानात पाय रोवून उभा राहिला. शेवटपर्यत त्याने आपली विकेट पडू दिली नाही. त्यानं 52 चेंडूत फटकेबाजी करत 83 धावांची खेळी केली. तर त्याला जाॅनी बेयरस्टोनची मोलाची साथ मिळाली. भारताकडून चहल आणि सुंदरला 1-1 बळी मिळाला.

दरम्यान, या 5 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड संघाने 2-1 अशी आघाडी मिळवली आहे. या मालिकेत आणखी दोन सामने बाकी असून पुढील सामना 18 मार्चला खेळवण्यात येणार आहे. तर रोहित शर्माचं संघात पुनरागमन झाल्यानं भारतीय संघाची ताकत आणखी वाढली आहे.

थोडक्यात बातम्या- 

महाराष्ट्रासाठी आरोग्यमंत्र्यांची केंद्र सरकारकडे ‘इतक्या’ कोटी लसींची मागणी!

जाणून घ्या…महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

पुणे विभागीय आयुक्तांना कोरोनाची लागण; नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन!

पुणे शहरातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

मोठी बातमी! पुण्यामध्ये कोरोना लस घोटाळा; तब्बल इतक्या हजार लसी गायब

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More