बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अबब! चक्क फुलपाखराचं ऑपरेशन; एकदा व्हिडीओ पाहाच  

नवी दिल्ली |  प्राण्यांची काळजी घेणं अनेक जणांना आवडत असतं. काही जण तर अत्यानंदाने हे काम करत असतात. काहींनी तर प्राण्यांची काळजी घेण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेलं आहे. प्राण्यांचा जीव वाचवण्यासाठी प्राणीवैद्यक शास्त्रात रोज नवनवीन प्रयोग आणि संशोधन होत असतात.

प्राण्यांचे वेगवेगळे ऑपरेशन होतानाचे व्हिडीओ तुम्ही यापूर्वी अनेकदा पाहिले असतील. इंटरनेटवर एका क्लिकवर ते उपलब्ध होतात. मात्र, तळहातावर मावणाऱ्या फुलपाखराचं ऑपरेशन तुम्ही कधी पाहिलं आहे का?, नसेल तर हा खास व्हिडीओ तुमच्यासाठीच आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून एका फुलपाखराचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये एका लहानशा फुलपाखराचं ऑपरेशन होताना दाखवण्यात आलं आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीनं छोट्याशा फुलपाखराला टिश्यू पेपरवर ठेवलं आहे. तर त्या व्यक्तीनं नंतर फुलपाखराचा एक पंख कापला आहे. पंख कापल्यावर फुलपाखराला एका जाळीत ठेवण्यात आलं आहे. थोड्या वेळानंतर एका मेलेल्या फुलपाखराचा पंख कापून नंतर तेच पंख नेटमध्ये ठेवलेल्या फुलपाखराच्या कापलेल्या पंखावर डिंकाच्या साह्यानं चिटकवण्यात आलं आहे. त्यानंतर या फुलपाखराला निरीक्षणाखाली ठेवून काही दिवसांनी सोडून देण्यात आलं आहे.

दरम्यान, फेसबुक वर Biólogos De Nacimiento नावाच्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ टाकण्यात आला आहे. व्हिडीओच्या शेवटी ऑपरेशन केलेलं फुलपाखरु यशस्वीपणे हवेत उडत असल्याचं दिसत आहे. याच कारणामुळं हा व्हिडीओ लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया दिल्या आहेत. या तीन मिनिटांच्या व्हिडीओला आतापर्यंत एकूण 19 लाख लोकांनी पाहिलं आहे.

पाहा व्हिडीओ

 

थोडक्यात बातम्या

‘…हे आम्हाला अजिबात आवडलं नाही’; बाळासाहेब थोरात मित्रपक्षांवर भडकले

‘अजून काही वर्ष ब्रिटीश भारतात पाहिजे होते’; दिग्दर्शक केदार शिंदे यांची फेसबुक पोस्ट

भारतातील कोरोनाची परिस्थिती पाहावेना; सुंदर पिचाई यांनी उचललं मोठं पाऊल!

#सकारात्मक बातमी | 105 वर्षीय आजोबा आणि 95 वर्षीय आजीची कोरोनावर मात

‘अँड द ऑस्कर गोज टू…’नोमडलँड’; सर्वोत्कृष्ट सिनेमाच्या पुरस्कारावर नाव कोरलं

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More