स्मार्टवाॅच खरेदी करताय?, ‘या’ गोष्टी आवर्जून तपासून बघा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | हल्ली स्मार्टवाॅचची ()Smartwatch क्रेझ प्रचंड वाढली आहे. अगदी कमीतकमी किंमतीतदेखील अनेक चांगल्या ब्रॅडेड कंपन्यांचं स्मार्टवाॅच बाजारात उपलब्ध आहेत. वेळ पाहण्यापासून ते तुमच्या आरोग्याबद्दल जागरुक राहण्यासाठी आपल्याला हे गॅजेट मदत करत. त्यामुळं तुम्ही जर स्मार्टवाॅच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या गोष्टींची काळजी घ्या.

स्मार्टवाॅच खरेदी करत असताना वाॅचचा बॅटरीबॅकअप (Battery backup) एकदा नक्की तपासून बघा. हल्ली स्माॅर्टवाॅचमध्ये जीपीएस(GPS), हार्ट रेटिंग यांसारखे फिचर्स उपलब्ध आहेत. जे निरंतर काम करत असतात. त्यामुळं वाॅचची (Watch) बॅटरी कमी होण्याची शक्यता असते. वारंवार चार्जिंगच्या(Charging) त्रासापासून दूर राहण्यासाठी चांगल्या बॅटरीची वाॅच खरेदी करा.

अनेकदा अ‌ॅपलचे (Apple) जे स्मार्टवाॅच फक्त अ‌ॅपल च्या वेगवेगळ्या सिरीझच्या स्मार्टफोनला(Smartphone) सपोर्ट करत, गुगल किंवा इतर Android फोनला करत नाही. त्यामुळं तुम्ही जर Android स्मार्टफोन वापरत असाल तर Android स्मार्टवाॅच घ्या. ते तुमच्या फोनलादेखील सपोर्ट करेल.

स्मार्टवाॅच हातात असल्या कारणानं हात कोठेही लागल्यास डिस्प्ले(Display) खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळं स्मार्टवाॅच खरेदी करत असताना चांगला डिस्प्ले पाहून घ्या. जो तुमच्या स्मार्टवाॅचचे ऊन्हापासूनदेखील संरक्षण करेल. तो डिस्प्ले रिस्पाॅन्सिव्ह (Display Responsive) टचचा देखील असायला हवा.

महत्त्वाच्या बातम्या