बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऑनलाइन मद्य खरेदी करणं महिलेला पडलं महागात, बसला लाखोंचा गंडा

रायगड | कोरोनाकाळामध्ये ऑनलाईन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात ओढा असल्याचं पाहायला मिळालं. अशातच ऑनलाइन मद्य ऑर्डर करण्यालाही ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली. पण यामधून फसवणुकीच्या घटना घडत असल्याचं अनेक वेळा समोर आलं.

अलिबागमध्ये असाच फसवणुकीचा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेल्या घटनेनुसार अलिबागमधील तक्रारदार महिलेने लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना वाइन ऑर्डर करण्यासाठी पिके वाईन्स पेजवरील आकर्षक ऑफर्स पाहून त्यावरून दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधत वाईनची ऑर्डर केली.

वाईन ऑर्डर केल्यानंतर अज्ञात व्यक्तीने त्यांना खात्यावर ती ऑनलाईन पैसे पाठवण्यास सांगितलं तसेच त्याप्रमाणे या महिलेने ही त्यांच्या खात्यावर पैसे पाठवले पण पैसे खात्यावर जमा झाले नाही असं सांगत संबंधित आरोपीने त्यांना वारंवार पैसे पाठवण्यास सांगितलं.

वारंवार पैसे पाठवल्यानंतर तब्बल 1 लाख 44 हजार रुपये तक्रारदार महिलेने पाठवले. त्यानंतर पैसे पाठवू नये ऑर्डर मिळाली नसल्याने या महिलेने आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर थेट अलिबाग पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली आहे.

विज्ञान या सर्व घटनेमुळे ऑनलाइन व्यवहार करताना पडताळणी करून खात्री करणं गरजेचं असल्याचं पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या सर्व प्रकरणात अलिबाग पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून नागरिकांनी कोणत्याही आमिषाला आणि भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

थोडक्यात बातम्या – 

आर्यन खानची कोठडी आज तरी संपणार का? जामीन अर्जावर आज परत सुनावणी

तेजस ठाकरे यंदाच्या दसऱ्या मेळाव्याला राजकारणात प्रवेश करणार?

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकरांच्या नावावर शिक्कामोर्तब?

इंधन दरवाढीचा एसटी महामंडळालाही फटका, एसटीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

सोमय्यांच्या ‘त्या’ संतापावर सचिन सावंत म्हणतात, दुखत्या नसेवर बोट ठेवल्यास…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More