काँग्रेस राष्ट्रवादीचे हात बळकट करायला आणखी एक घटक पक्ष आघाडीत सामिल

मुंबई |  लोकसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर आलेली असताना काँग्रेस राष्ट्रवादीला बहुजन विकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. हितेंद्र ठाकूरांची बविआ आघाडीत सामिल झाली आहे.

पालघरच्या जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी बविआला पाठिंबा देणार आहे. त्यामुळे या ठिकाणची आघाडीची ताकद वाढली आहे.

पालघरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. आता मात्र हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे लढणार आहेत.

दरम्यान, शिवसेनेने पालघरच्या जागेवर अद्याप आपला उमेदवार घोषित केलेला नाही.

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंच्या जीवाला धोका, पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी

लालकृष्ण अडवाणींना तिकीट न दिल्याने काँग्रेसचा भाजपवर बोचरा वार!

प्रवीण छेडांच्या भाजप प्रवेशानं सोमय्यांचं तिकीट कापलं जाण्याची जोरदार चर्चा!

शिवसेनेची 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ‘यांना’ मिळालीय संधी….

संजय काकडेंचं बंड झालं थंड…. काँग्रेसवारी टळली!