बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बिडीची जेवढी किंमत महाराष्ट्रात आहे तेवढी सुद्धा ईडीची राहिली नाही”

नांदेड | राज्यात सध्या केंद्रीय तपास यंत्रणा आणि महाविकास आघाडीमध्ये चांगलाच कलगीतूरा रंगला आहे. देगलूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुरू आहे. भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये दोन्हीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. महाविकास आघाडीचे मंत्री भाजपवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. आताही राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

देगलूर-बिलोलीची विधानसभा निवडणूक ही आपल्या अस्मितेची असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. या निवडणूकीत विजय मिळवून आपल्याला महाविकास आघाडीची ताकद दिल्लीला दाखवून द्यायची आहे, अशी गर्जना यावेळी धनंजय मुंडे यांनी देगलूर येथील प्रचारसभेत बोलताना केली आहे. भाजप आणि महाविकास आघाडी दोन्हीकडील नेते एकमेकांवर जहरी टीका करत आहेत.

बिडीची जेवढी किंमत महाराष्ट्रात आहे तेवढी सुद्धा ईडीची राहिली नाही, या शब्दात धनंजय मुंडे यांनी ईडीच्या कारवाईवर टीका केली आहे. केंद्रात बसलेल्या मोदी सरकारच्या कानापर्यंत आपल्या महाविकास आघाडीचा आवाज जायला हवा, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. राज्यातील या पोटनिवडणुकीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर भाजपकडून पंढरपूरसारख्या निकालाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, काॅंग्रेसचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर काॅंग्रेस या निवडणुकीत आपली सर्व ताकद पणाला लावून त्यांच्या मुलाला निवडूण आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणजे काॅंग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी ऐन निवडणूकीत भाजपला खिंडार पाडलं आहे.

थोडक्यात बातम्या 

सावधान! दिवाळीची ऑनलाईन शाॅपिंग करताय? मग घ्या ‘ही’ खबरदारी

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे आक्रमक; केली ‘ही’ मोठी घोषणा

“ज्यांनी तुमच्या हातात दगड दिले त्यांनी तुमचं काय भलं केलं?”

यंदाच्या दिवाळीतही चीनी दिव्यांचाच लखलखाट; चीनी मालाची कोट्यवधींमध्ये उलाढाल

‘समीर वानखेडे 2 लोकांचे फोन टॅप करत आहे’, नवाब मलिकांच्या आरोपाने खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More