बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सीएस’ परिक्षेच्या वेळापत्रकात ऐनवेळी बदल; आज, उद्याचे पेपर पुढे ढकलले

मुंबई | ‘इन्स्टीट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया’ (आयसीएसआय) तर्फे आजपासून (20 डिसेंबर) सुरू होणाऱ्या ‘कंपनी सेक्रेटरी’ (सीएस) परिक्षेच्या वेळापत्रकात ऐनवेळी बदल करण्यात आला आहे. सुरुवातीच्या दोन दिवसाचे पेपर पुढे ढकलण्यात आले असल्याचं आयसीएसआयनं गुरूवारी जाहीर केलं आहे.

आयसीएसआय तर्फे 20 ते 30 डिसेंबर दरम्यान कंपनी सेक्रेटरी (सीएस) परिक्षा  देशभरातील विविध परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परिक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. परिक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत, असंही इन्स्टीट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया तर्फे जाहीर करण्यात आलं आहे.

सीए एक्झिक्युटिव आणि प्रोफेशन अशा दोन स्तरावर ही परिक्षा घेण्यात येते. यात जुन्या व नविन अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. दोन पेपर वगळता इतर पेपर ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील अशी माहिती संस्थेतर्फे देण्यात आली आहे.

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशभरात सुरू असलेल्या आंदोलनामुळं पेपर पुढं ढकलण्यात आला आहे, अशी माहीती समजत आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More