बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी : महाराष्ट्रातील लॅाकडाऊन ‘या’ तारखेपर्यंत वाढवण्यावर मंत्रिमंडळात एकमत

मुंबई | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवण्याबाबत चर्चा झाली.

राज्य मंत्रिमंडळाच्याबैठकीत राज्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यावर मंत्रिमंडळात एकमत झाल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं आहे. राज्यात लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याची एकमताने मागणी बैठकीत झाली. लॉकडाऊन वाढवण्याबाबत मंत्रिमंडळ आग्रही आहे. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असं राजेश टोपेंनी सांगितलं आहे.

लॉकडाऊनबाबत अनेकांना अपेक्षा आहेत. मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत बोलून दाखवलं. कारण लॉकडाऊन केल्यानंतर कोरोना रुग्णसंख्या कमी झाली. साधारणतः कोरोना रुग्णांच्या संख्येत 7 लाखांना पोहचलेला महाराष्ट्र आता 4 लाख 75 हजाराच्या दरम्यान आलाय. म्हणजे मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या संख्येत घट झाली, असं राजेश टोपेंनी सांगितलं.

दरम्यान, लसींच्या कमी पुरवठ्यामुळे राज्य सरकारने 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील लसीकरण केंद्रावर आता केवळ दुसरा डोस घेणाऱ्यांनीच यावं. पहिला डोस लसीकरण केंद्रांवर आता मिळणार नाही. पहिल्या डोसनंतर दुसरा डोस कोरोना रोखण्यासाठी तितकाच महत्वाचा आहे, असं राजेश टोपे म्हणाले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राजेश टोपेंनी ही माहिती दिली.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण तूर्तास बंद

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नितीन राऊत यांनी केली ही मोठी घोषणा

चिंताजनक! ‘या’ जिल्ह्यात ज्याची कोरोना टेस्ट होतेय तो पॉझिटिव्ह येतोय

भावाला Oxygen Cylinder न मिळाल्याने जवानाने केंद्रीय मंत्र्याला दिली जीवे मारण्याची धमकी!

समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांची प्रकृती चिंताजनक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More