बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप जाहीर; वाचा कोणाला कोणतं मंत्रिपद?

नवी दिल्ली | आज मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना मोदी सरकारने आपल्या मंत्रिमंडळात संधी दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील 4 भाजप नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामील करून घेतलं आहे.

आज मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर शपथविधी सोहळा पार पडला आणि खातेवाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर अवघ्या काही तासातच मोदी सरकारने खातेवाटप जाहीर केलं आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नव्याने दिलेल्या जबाबदाऱ्या

  • अमित शाह – सहकार मंत्री
  • ज्योतिरादित्य सिंधिया – हवाई वाहतूक मंत्री
  • पियुष गोयल – वस्त्रोद्योग मंत्री
  • मनसुख मांडविय – आरोग्य मंत्री
  • मुंजपारा महेंद्रभाई – महिला व बाल कल्याण राज्यमंत्री
  • मीनाक्षी लेखी – परराष्ट्रमंत्री
  • नारायण राणे – लघु व मध्यम उद्योग मंत्री
  • हरदिप सिंह पुरी – नगर विकास व पेट्रोलियम मंत्री
  • अश्विनी वैष्णव – रेल्वेमंत्री
  • धर्मेंद्र प्रधान – शिक्षण मंत्री
  • कपिल पाटील – पंचायत राज राज्यमंत्री
  • भागवत कराड – अर्थराज्यमंत्री
  • भारती पवार –  आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री

नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार वरील प्रमाणे खातेवाटप जाहीर झालं असून आपापल्या मंत्रालयाची जबाबदारी मंत्र्यांना सोपवण्यात आली आहे. तसेच अजूनही खाते वाटपाची प्रक्रिया सुरू असून सर्वांना आपापल्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत.

 

थोडक्यात बातम्या – 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More