बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मंत्रिमंडळ विस्ताराचं अखेर ठरलं; भाजपकडून 4 ते शिंदे गटाकडून 4 आमदारांना फोन

मुंबई | राज्यात सत्तातर झालं. शिंदे सरकार अस्तित्वात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि पदभार सांभाळला. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी हाती घेतली. या नंतर मात्र मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? याची सगळेजण वाट पाहत होते. यावरुन विरोधी पक्षातून टीकाही केली जात होती. यातच आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे.

अखेर इतके दिवस रखडलेला आणि बहुचर्चित अश्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहुर्त लागला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या अनेक दिल्लीवाऱ्यानंतर शेवटी कोणाला कोणत मंत्रीपद मिळणार याचा निकाला लागला आहे. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार उद्या 20  ते 25  लोकांचा शपथविधी होणार असल्याचं समोर आलं आहे. काही नेत्याना कॉल गेल्याने त्यांची मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

यामध्ये भाजपमधील चार तर शिंदे गटातील पाच लोकांना फोन गेल्या असल्याची माहिती समोर आली आहे. आशिष शेलार यांना भाजपचे नवे प्रदेशाध्यक्षपद मिळणार असल्याची चर्चा आहे. तसेच काहीनां मुबंईत येण्याचा आदेश देण्यात आला आहे. यानुसार सगळे मुंबईलाही रवाना झाले आहेत. संजय कुटे बंटी भांगडिया (Bunty Bhangadiya), रविंद्र चव्हाण आणि अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या नावाची देखील चर्चा मंत्रिपदासाठी आहे.

गुलाबराव पाटील, उदय सामंत (Uday Samant), संजय शिरसाट (Sanjay Shirsat), संदिपान भुमरे आणि दादा भुसे या शिंदे गटातील नेत्यांना  मंत्री करण्यात येणार असल्याचे बोलल जात आहे. त्यामुळे आता कोणत मंत्रीपद कोणाला मिळणार हे उद्याच्या शपथविधीनंतर समोर येईल. यासंबधी उद्या सकाळी 9 वाजता सह्याद्रीवर बैठक होणार असल्याचं समोर आलं आहे.

थोडक्यात बातम्या

राज्यातील ‘या’ भागांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी

“तुम्ही स्वाभिमानी असाल तर, महाराष्ट्र मुघलांच्या तावडीतून सोडवा”

मोठी बातमी! संजय राऊतांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या मुलींची नावं, प्रमाणपत्र रद्द

मोठी बातमी! बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप होणार?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More