बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ मोठे निर्णय; वाचा एका क्लिकवर

मुंबई | बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी राज्यातील कोरोना परिस्थितीसह विविध मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. महाविकास आघाडी सरकारकडून (Mahavikas Aghadi government) मंत्रीमंडळ बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली.( Maharashtra Cabinet Meeting)

कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागाकडून, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद या संस्थांचे विलिनीकरण करून महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय आणि प्रशिक्षण मंडळ निर्माण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यातील बाजार समित्या मजबूत करण्याकरिता महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास आणि अधिनियम 1963 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वयं अर्थसाहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्याकरिता इरादा पत्राचा कालावधी वाढवण्यात आला आहे. तसेच नागपूर येथील राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी वारंगा येथे विद्यार्थी वसतीगृह आणि इतर निवासी इमारतीच्या बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, महसुल विभागाकडून महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 मधील कलम-2 आणि सदर अधिनियमाच्या अनुसूची 1 च्या अनुच्छेद 25 सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून शासकीय न्याय साहाय्यक संस्थांमधून पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थांना वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी दिली जाणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

अपघाताच्या 24 तासांपूर्वी बिपीन रावत यांनी दिला होता ‘हा’ गंभीर इशारा

“2024 मध्ये भाजपचे 418 खासदार येणार, सगळे मोदींनाच मतदान करणार”

अन् राजसाहेब मला म्हणाले,”तू काही स्ट्रेसमध्ये आहेस का?”; वसंत मोरेंची भावनिक पोस्ट

सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या IAF MI 17 हेलिकॉप्टरचा अपघात; वाचा सविस्तर माहिती

भाजपचं टेन्शन वाढलं! उत्तर प्रदेश निवडणुकीआधी प्रियंका गांधींचा मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More