मुंबई महापालिकेतील ‘त्या’ फायलींची चौकशी होणार, कॅगचा चौकशीचा आदेश!

File Missing

Missing Files l मुंबई महापालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) इमारत प्रस्ताव विभागात तब्बल 3,000 फायली गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वॉच डॉग फाउंडेशनने (Watchdog Foundation) केलेल्या तक्रारीची दखल घेत कॅगने (Comptroller and Auditor General of India) या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या 15 दिवसांत या प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश कॅगने दिले आहेत.

गहाळ फायली, कोट्यवधींचा भ्रष्टाचार आणि मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष :

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश दिले होते, परंतु त्यात कोणतीही प्रगती न झाल्याने अखेर कॅगला पाऊल उचलावे लागले आहे. भाजप आमदार अमित साटम (Amit Satam) यांनी विधानसभेत (Assembly) या प्रकरणावर चिंता व्यक्त करत गंभीर आरोप केले होते. त्यांच्या आरोपानुसार, “गेल्या 25 वर्षांत महापालिकेत 3 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार (Corruption) झाला आहे.” कोलकाता (Kolkata) येथील शेल कंपन्यांद्वारे (Shell Companies) मनी लाँड्रिंगचे (Money Laundering) आरोपदेखील त्यांनी केले होते. या आरोपांसंदर्भात त्यांनी विशिष्ट नावे आणि तपशीलही दिले होते. मुख्यमंत्र्यांनी या आरोपांची कालबद्ध चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते.

Missing Files l कॅगच्या अहवालातील गंभीर त्रुटी आणि चौकशीची मागणी :

कॅगच्या विशेष लेखापरीक्षण अहवालात पालिकेतील अनेक महत्त्वपूर्ण त्रुटी उघडकीस आल्या होत्या. या त्रुटींमध्ये निविदा (Tender) किंवा करारांशिवाय (Contract) कोट्यवधी रुपयांचे कंत्राट देणे, दक्षता आणि खरेदी नियमांचे उल्लंघन, पारदर्शकतेचा अभाव आणि कंत्राटदारांप्रती पक्षपाती धोरण या बाबींचा समावेश होता. तसेच, यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान आणि खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर, इमारत प्रस्ताव विभागातील गहाळ झालेल्या फायलींची सखोल आणि कालबद्ध चौकशी करण्याची मागणी वॉच डॉग फाउंडेशनने सरकार आणि कॅगकडे केली होती. त्यानुसार, कॅगने याची गंभीर दखल घेतली असल्याचे वॉच डॉग फाउंडेशनचे गॉडफ्रे पेमेंटा (Godfrey Pimenta) यांनी सांगितले.

गॉडफ्रे पेमेंटा यांच्या मते “महापालिकेतील गहाळ फायलींविषयी कॅगने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे चौकशी अहवालातून निश्चितच सत्य समोर येईल.”

मुंबई महापालिकेतील 3,000 गहाळ फायली आणि कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी कॅगमार्फत होणार असल्याने या प्रकरणाला एक वेगळे वळण लागले आहे. या चौकशीतून काय निष्पन्न होते आणि दोषींवर काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

News Title: CAG Orders Inquiry into Missing Files in BMC, Allegations of 3 Lakh Crore Corruption

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .