Top News

उज्ज्वला योजनेत मोठा भ्रष्टाचार; कॅगचे नरेंद्र मोदी सरकारवर ताशेरे

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गाजावाजा करत उज्ज्वला योजनेची घोषणा केली होती. 2019 निवडणुकीच्या प्रचारात सर्वात जास्त या योजनेचा वापर केला. या योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला असल्याचं आता कॅगने उघडकीस आणलं आहे.

कॉम्प्टोलर अँड ऑडिटर जनरल म्हणजेच कॅगने मोदींच्या महत्वकांक्षी योजनेवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. मोठ्या कुटुंबामध्ये महिन्याला 3 ते 9 सिलेंडर देण्यात आली असल्याची माहिती कॅगच्या अहवालात देण्यात आली आहे.

कोणत्याही गरीब किंवा सर्वसामान्य कुटुंबात मोठ्या प्रमाणात गॅस वापरला जाण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळं हे गॅस सिलेंडर व्यावसायिक कारणांसाठी वापरले गेले असल्याची शक्यता कॅगने व्यक्त केली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरवर जास्त टॅक्स आकरला जातो म्हणून ते घरगुती सिलेंडरपेक्षा महाग असतात, असंही कॅगच्या अहवालात म्हटलं आहे.

दरम्यान, रोज एकापेक्षा जास्त सिलेंडरचे बुकिंग आणि वितरण करण्याच्या कोणत्याही प्रकारच्या नियमांचा अडथळा नव्हता, असा खुलासा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या