बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मला आता फोन करा, मी तुमच्यासाठी कपडे काढेन”; पूनम पांडेचा धक्कादायक खुलासा!

मुंबई | अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला अश्लील व्हिडीओ बनवणे आणि अपलोड करणे या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. राजच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस येऊ लागल्या आहेत. अशातच आता अभिनेत्री पूनम पांडे हिने राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका देखील केली आहे. ही याचिका दाखल केल्यानंतर आता पूनमने अनेक धक्कादायक खुलासे करत राज आणि त्याच्या कंपनीवर काही गंभीर आरोप केले आहेत.

राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीने मला जबरदस्ती एका करारावार साईन करण्यास भाग पाडले होते. त्यांच्या मागणीनुसार मला पोजींग करावी लागेल अन्यथा ते माझ्या वैयक्तिक गोष्टी लीक करतील, अशी धमकीच मला त्यांनी दिली होती, असा आरोप पूनमने केला आहे.

तसेच मी करारावर साईन करण्यासाठी तयार नव्हते त्यावेळी यांनी माझा पर्सनल मोबाईल नंबर एका मेेसेजसोबत लीक केला होता. या मेसेजमध्ये लिहीलं होतं की, मला आता फोन करा, मी तुमच्यासाठी कपडे काढेन. यानंतर खूप लोक मला फोन करत नको त्या गोष्टींची मागणी करु लागले. तसेच काहिंनी मला अश्लील फोटो देखील पाठवण्यास सुरुवात केली, असं देखील पूनम पांडेनं सांगितलं आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये तब्बल 8 ते 10 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याप्रकरणी राज कुंद्राविरोधात दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. राजविरूद्ध अनेक पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

थोडक्यात बातम्या –

नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारा अपघात, चार मित्रांचा मृत्यू

‘भारतरत्न पुरस्कार माझ्या वडिलांच्या पायाच्या नखाच्याबरोबरीचा’; प्रसिद्ध अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

मनसेच्या दहीहंडीला 100 टक्के नाचायला येणार – प्रविण तरडे

“देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थाने मराठा समाजाचे कैवारी आहेत”

राज्यांना ‘इतक्या’ कोटी लसींचे डोस दिले; केंद्र सरकारने जाहीर केली आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More