नागपुरचं आर्थिक गणित सुधारण्यासाठी तुकाराम मुंढेंना आणा- विजय वडेट्टीवार

नागपूर | नागपूर महापालिकेची आर्थिक शिस्त बिघडलेली आहे. त्यामुळे पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी तुकाराम मुंढे यांच्याकडे द्या, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 

नागपूरची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे. विकासकामांचे पैसे कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च करावे लागत आहेत, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. 

एकही अधिकारी इथं जास्त काळ टिकत नाही. अशा स्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात तुकाराम मुंढेंना आणावं, अशी मागणी त्यांनी केली. 

दरम्यान, तुकाराम मुंढे जिथे गेले तिथं कामं नियमानं केली. मात्र तेथील नगरसेवकांना ते पटलं नाही. त्यामुळे जर ते नागपुरात आलेच तर येथील भाजप नगरसेवकांना किती पटेल हे सांगता येणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार

-जिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू!

-संघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही!

-महाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का?; शिवसेनेचा सरकारला सवाल

-राम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल