बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्वत:ला हिंदू नाही तर भारतीय म्हणा, सगळ्यांचा DNA एकच- मोहन भागवत

गाझियाबाद | गेल्या काही महिन्यांपासून देशात धार्मिक कट्टरवादी प्रवृत्ती वाढताना दिसतीय. त्यात आता गाझियाबाद या ठिकाणी मुस्लिम राष्ट्रीय मंचाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आपला धर्म कुठलाही असला तरी आपण भारतीय आहोत. त्यामुळं हिंदूंनी स्वतःची ओळख भारतीय म्हणून करून द्यावी, हिंदू आणि मुस्लिम आपण दोघंही एकत्र चालत आलो आहोत, चालत आहोत आणि भविष्यातही एकत्रच चालत राहू, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

माॅब लिंचिंग म्हणजेच जमाव हत्या करणारे, मारहाण करणारे हिंदुत्व विरोधी आहेत. सगळ्या भारतीयांचा DNA एकच आहे, असंही भागवत यांनी म्हटलं आहे. एकमेकांवर हल्ले करणं, एकमेकांवर कुठल्या ना कुठल्या कारणानं समुहानिशी चालून जाणं, हे प्रकार भारतीय संस्कृतीशी विसंगत असून ते ताबडतोब थांबायला हवेत आणि अशा प्रकारांचा निषेध करायला हवा, अशी भावना त्यांनी कार्यक्रमात व्यक्त केली आहे.

देशातील हिंदू-मुस्लिम एकता एक भ्रामक चर्चा आहे. कारण आम्ही वेगळे नाही, एकच आहोत. पूजा करण्याच्या पद्धतीवरून लोकांमध्ये भेदाभेद करणं चुकीचं आहे. हिंदुस्थान हे एक राष्ट्र असून मुस्लिमांना आपली ओळख संपवण्याची किंवा नष्ट करण्याची काहीच गरज नाही. मुळातच हिंदू आणि मुस्लिम वेगळे नाहीत, असंही मत भागवतांनी या कार्यक्रमात व्यक्त केलं आहे.

दरम्यान, काही लोक मला भोळसट समजतील, पण मी सत्यच सांगणार असल्याचं भागवत म्हणाले. हिंदू आणि मुस्लिम हे 40 हजार वर्षांपासून गुण्यागोविंदाने एकत्र नांदत असल्यामुळं दोघांचाही जिन्स एकच असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. माझ्या या वक्तव्याचं अनेकांचं आश्चर्य वाटेल, पण विचारी हिंदू माझं हे मत मान्य करतील, असंही भागवतांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘दिरंगाईचा खेळ कायमचा थांबवा’; अमित ठाकरे संतापले

चिंता वाढली! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ

आता पुण्यातील ‘या’ नव्या रेल्वे स्थानकावरून सुटणार स्वतंत्र रेल्वेगाड्या; 9 जुलैला सुटणार पहिली रेल्वे

मुंबईतील कोरोना आटोक्यात; नव्या बाधितांसह सक्रिय रूग्णसंख्येत घट!

पुणे कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारवर घणाघात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More