बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पवारांचा महेबूब शेख ठाकरे सरकारची मेहबूबा”

मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तज्ज्ञांकडून शक्यता वर्तवली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी धार्मिक स्थळांवर निर्बंध लावले आहेत. राज्यात गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यावर शासनाने निर्बंध लावले आहेत. या उत्सवाच्या काळात मंदिरे सुरू करण्यासाठी भाजप आग्रही आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी राज्य सरकारसह राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर ट्विट करत निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी राष्ट्रवादीच्या पैठण येथील 35 शाखांच्या उद्धाटनाचे फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित केले होते. तुषार भोसले यांनी महेबूब शेख यांच्या फोटोंचा दाखला घेत भोसलेंनी ठाकरे सरकार आणि महिबूब शेख यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. गर्दी होवू नये म्हणून आम्ही मंदिरे बंद ठेवतो आहोत अशी सतत टीमकी वाजवण्यात शरद पवार, संजय राऊतांपासून ठाकरे सरकारचे मंत्री नेते गर्क आहेत, असं आपल्या ट्विट मध्ये भोसले म्हणाले आहेत.

ठाकरे सरकारच्या सर्वच नियम कायद्यातून सूट मिळते ती फक्त महेबूब शेख यांना. कारण पवारांचा महेबूब ठाकरे सरकारची मेहबूबा आहे म्हणत भोसलेंनी महाविकास आघाडी सरकारवर जहरी टीका केली आहे. तुषार भोसले यांनी मेहबूब शेख यांच्या कार्यक्रमात गर्दी करून कोरोनाचे नियमांची पायमल्ली केलेले बातम्यांचे संदर्भ दिले आहेत.

दरम्यान, या गर्दीतून कोरोनाचा धोका अजिबात नाही; कारण ती सरकारी पक्षांच्या फायद्याची आहे. कोरोना फक्त मंदिरातून पसरतो. जिथे देव भक्तांची भेट होते आणि लाखो भक्तांचे पोट भरतं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारने घातलेल्या निर्बधांवर बोट ठेवलं आहे.

 

थोडक्यात बातम्या –

आधी पाॅर्न वेबसाईट त्यानंतर…; एकतर्फी प्रेमातून तरुणाने केल्या धक्कादायक गोष्टी!

ऐकावं ते नवलच! लाल मुंग्यांची चटणी कोरोनावर ठरते उपायकारक

सीरम इन्स्टिट्युटला केंद्राची नवीन ऑर्डर; वर्षाच्या शेवटी मिळणार ‘इतक्या’ कोटींच्या लशींचा डोस

मोठी बातमी! पाचव्या कसोटी सामन्यावर कोरोनाचे सावट, अखेरचा सामना रद्द

‘मौका सभी को मिलता है’ म्हणत नितेश राणेंचा विरोधकांना इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More