मुंबई | बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हा मुंबई हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. आता शरद पवार यांच्यामुळे तो पुणे झाला आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यावरून भाजप नेते अवधूत वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे पुण्याला असल्याचे सांगत शिवसेना नेते संजय राऊत यांनीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आरसा दाखवला, असा टोला अवधूत वाघ यांनी लगावला. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय.
बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हा मुंबई हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. आता शरद पवार यांच्यामुळे तो पुणे झाला आहे, असं बोलून संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना आरसा दाखवला, असं ट्विट अवधूत वाघ यांनी केलं आहे.
दरम्यान, पुण्यात श्रमिक पत्रकार संघात शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी मुक्त संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
महत्त्वाच्या बातम्या-
अन् भर सभेत ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, काँग्रेसला मत द्या…
“मराठा समाजाबाबत सातत्याने गरळ ओकणाऱ्या वडेट्टीवारांना धडा शिकवा, त्यांची सरकारमधून हकालपट्टी करा”
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी अनिल देशमुख, नवनीत राणांसह 17 जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता