Top News महाराष्ट्र मुंबई

“रामभक्तांना भिकारी म्हणता, शिवसेनेचं हे कसलं हिंदुत्व?”

मुंबई | अयोध्येतील राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करणाऱ्या रामभक्तांना शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी भिकारी म्हटलं होतं. यावरुन हे शिवसेनेचं कसलं हिंदुत्व आहे?, असा सवाल करत भाजपचे आमदार राम कदम यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

यासंदर्भात राम कदम यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं की, “राममंदिराच्या निर्माणमध्ये प्रत्येक हिंदू बांधवांची आणि रामभक्तची मनापासून इच्छा आहे की निर्माणमध्ये मंदिराची एक विट का होईना आपली असावी असं असताना देखील, मंदिर निर्माणमध्ये भाग घेणाऱ्या हिंदू बांधव रामभक्तांना भिकारी संबोधनं ? हे शिवसेनेचे कोणतं हिंदुत्व?”

अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळं रामभक्तांचा अपमान झाला आहे. त्यामुळं शिवसेनेनं सर्व रामभक्तांची तातडीनं माफी मागितली पाहिजे, अशी देखील राम कदम यांनी केली आहे.

दरम्यान, राम कदम यांनी केलेल्या सवालाला शिवसेना काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं”

अनैतिक संबंधांमध्ये पैसा पडला फिका; प्रियकरानं प्रेयसीचा जीवच घेतला!

सुंदर मुली दाखवायच्या अन्… तुमच्यासोबतही हा प्रकार घडत असेल तर सावधान; पोलिसांचं आवाहन

“श्री राम नाव घेतल्यानं काहींना राग का येतो?”

‘आम्हीही याच देशाचे, ओबीसी जनगणनेची आवश्यकता’; पंकजा मुंडेंनी केंद्र सरकारला करून दिली आठवण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या