बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राणेंच्या घराला सिंहाची गुहा म्हणणं हा सिंहाचा अपमान”

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या वादग्रस्त टीकेमुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. जुहुमधील राणेंच्या घरापुढे शिवसैनिकांचा भावनांचा उद्रेक पाहायला मिळत आहे. अशातच आता या वादावर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीये.

विनायक राऊत यांनी नारायण राणेंना मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी करणारं पत्र पंतप्रधानांना लिहिलं आहे. याशिवाय माध्यमांशी बोलताना राऊतांनी राणेंवर चांगलाच निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं आहे. राणेंचं घर ही सिंहाची गुहा नाही कोल्ह्याची आहे. लाचार लोकांच्या घराला सिंहाची गुहा म्हणणं हा सिंहाचा अपमान आहे, अशी खोचक टीका विनायक राऊतांनी राणेंवर केली आहे.

पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात राऊतांनी नारायण राणे हे राज्याला लागलेली पनौती आहे, असंही म्हटलं आहे. भाजपलाही आगामी निवडणुकीत पनौती लावून घ्यायची नसेल तर नारायण राणेंना आत्ताच त्यांची जागा दाखवून द्या, असा सल्लाही राऊतांनी भाजपला दिला आहे.

दरम्यान, नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेवेळी महाड येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर राणे यांनी जोरदार टीका केली. राणेंनी म्हटलं मी उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावली असती. यानंतर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

थोडक्यात बातम्या – 

उद्धव ठाकरे मोदींना ‘चोर’ म्हणाले, मग त्यांचं काय करायचं?- चंद्रकांत पाटील

“नारायण राणेंना अटक करण्याची तुमच्यात हिंमत नाही”

महाराष्ट्राच्या विकासासाठी नारायण राणेंनी हे वक्तव्य केलं- रामदास आठवले

‘…तरच विसर्जनात सहभागी होता येणार’; गणेशोत्सवाची नियमावली जाहीर

“तो फक्त मुख्यमंत्र्यांचा नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेचाही अपमान”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More