बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विवाहीत प्रियकराला घरी बोलावून त्याचीच केली हत्या, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

औरंगाबाद | औरंगाबादमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमध्ये एका तरुणीने आपल्या प्रियकराला घरी बोलावून त्याची हत्या केली असल्याचं उघडकीस आलं आहे. तसेच या हत्येमागील धक्कादायक कारण देखील समोर आलं आहे. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

मृत झालेल्या प्रियकराचं नाव रवी कुमार असं आहे तर आरोपी तरुणीचं नाव सिंपी कुमारी असं आहे. रवी आणि सिंपी दोघेही प्रेमसंबंधांमध्ये होते. त्यांच्या प्रेमसंबंधांची माहिती सिंपीच्या घरातल्यांना मिळाली होती. त्यानंतर सिंपीच्या घरातल्यांनी त्यांच्या नात्याला नकार दिला होता.

सिंपीच्या नातेवाईकांनी तिला रवीला फोन करुन घरी बोलावून घेण्यास सांगितलं. रवी घरी पोचताच त्याची बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आली आणि त्यानंतर त्याचा मृतदेह गावाबाहेर फेकण्यात आला. रवी हा विवाहीत होता. तो घरी न आल्याने त्याच्या पत्नीने तक्रार नोंदवली. त्यानंतर रवीचा शोध घेण्यात आला असता गावाबाहेर त्याचा मृतदेह अढळला.

दरम्यान, मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपास चालू केला. यावेळी ही हत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्याचं समोर आलं. तसेच त्यानंतर सिंपी हिला अटक करण्यात आली आहे. मात्र तिच्यासोबत हत्येमध्ये सामील असलेले नातेवाईक फरार असल्याने त्यांचा शोध सुरु आहे.

थोडक्यात बातम्या-

मुंबईत प्रेमीयुगुलाने वृद्ध महिलेचा चिरला गळा, दीड महिन्यांनी धक्कादायक कारण आलं समोर

कीडाप्रेमींसाठी मोठी बातमी! ‘या’ देशात पार पडणार आयपीएलचे उर्वरित सामने

डॉक्टर दाम्पत्याचा दिवसाढवळ्या भररस्यात गोळ्या घालून केला खून, पाहा व्हिडीओ

महिला आरोपी पळण्याच्या प्रयत्नात रेल्वे ट्रॅकवर पडली अन्…; थरारक घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर

‘माही’ झाला पुणेकर; पुण्यातील ‘या’ भागात घेतलं आलिशान घर 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More