शहा हा पर्शियन शब्द; भाजपाध्यक्ष अमित शहांचं नाव बदलण्याची मागणी

नवी दिल्ली | नाव बदलण्याची सुरुवात भाजपने पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यापासून करायला हवी. त्यांच्या नावातील ‘शहा’ हा शब्द संस्कृत नसून पर्शियन असल्यानं त्यामध्ये बदल करावा, असं आव्हान इतिहास संशोधक इरफान हबीब यांनी दिलं आहे. 

गुजरात हे नावसुध्दा पर्शियन असून तेही भाजपने बदलावं, असं त्यांनी म्हटलं आहे.

‘आरएसएस’च्या हिंदुत्वाच्या धोरणाप्रमाणे भाजपशासित राज्यात शहरांची नावं बदलण्यात येत आहेत, असा दावा त्यांनी केला. 

दरम्यान, भाजप आमदार जगनप्रसाद गर्ग यांनी आग्रा शहराचं नाव बदलून अग्रवन करण्याची मागणी केली होती, त्याबाबत इरफान हबीब ‘टाईम्स ऑफ इंडिया’ शी बोलत होते.

महत्त्वाच्या बातम्या-

-दिवाळीत बंद झालेलं भारनियमन पुन्हा सुरु होणार नाही; उर्जामंत्र्यांची घोषणा

-औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव करण्यासाठी पाठपुरावा करु!

-भाजपऐवजी जेडीयूमध्ये का प्रवेश केला?; पाहा काय म्हणाले प्रशांत किशोर…

-सिंचन घोटाळा प्रकरण; अजित पवारांबाबतची भूमिका न्यायालयात मांडू- मुख्यमंत्री

-प्रशांत किशोर यांचं नवं भाकीत; पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी झटका!