सायकलिंग करणाऱ्या पुरुषांसाठी इशारा, अभ्यासातून धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली | सायकल (bicycle) चालवणं हा एक प्रकारचा व्यायाम असल्याचं सांगितलं जातं. लहानमुलांपासून ते वृद्धापर्यंतच्या व्यक्तींना सायकल चालवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र नुकताच करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सायकल चालवण्याने पुरुषांमध्ये नपुसंकता येण्याची शक्यता असल्याचं समोर आलं आहे.

असं म्हणलं जातं की एका ठिकाणी बसल्याने नपुसंकतेचा (impotence) धोका वाढू शकतो. त्याचप्रमाणे तो सायकल चालवण्याने देखील होतो. हार्वर्डच्या विशेष आरोग्य अहवालानुसार सायकलिंगमुळे मज्जातंतूंचे नुकसान होते. असे समोर आले आहे.

जेव्हा पुरुष सायकल चालवण्यासाठी सीटवर बसतात तेव्हा त्याचा प्रायव्हेट पार्ट चिरडला जातो. त्याच्यामुळे प्रायव्हेट पार्टच्या नसांवर दबाव येतो आणि ज्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन (Erectile Dysfunction) होते. जे प्रजननासाठी आणि आरोग्यासाठी चांगलं नाहीये.

नसांवर दाब पडल्यानंतर त्या भागात होणारा रक्तप्रवाह (blood flow) कमी होतो. त्यामुळे पुरुषांचा प्रायव्हेट पार्ट सुन्न होतो आणि त्रास व्हायला लागतो. अशा गोष्टी खराब सीट आणि योग्य प्रकारे सायकलिंग न केल्यामुळे देखील होतात. यामुळे तुमची सेक्स(Sex) करण्याची इच्छा देखील कमी होते. याचा परिणाम तुमच्या नात्यावर होण्याची शक्यता असते

संशोधकांनी (Researcher) केलेल्या अभ्यासात असं दिसून आलं आहे की आठवड्यातून 3 तासांपेक्षा जास्त सायकल चालवणाऱ्या पुरुषांमध्ये ही समस्या सर्वात जास्त दिसून येेते. यावर उपाय म्हणून नेहमी सायकल चावलत असताना 10 मिनिटांनी सायकलवर उभे राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

तुम्ही सायकल चालवण्यास काहीच हरकत नाही मात्र थोड्या थोड्या अंतराने उभे राहिल्यास प्रायव्हेट पार्टवर (Private part) पडलेला दबाव कमी होतो. नसांवरचा दाब देखील कमी होतो. त्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन पासून वाचू शकता.

महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More