औरंगाबाद महाराष्ट्र

मराठ्यांना आरक्षण देता येत नसेल तर त्यांच्याकडे मतं मागायलाही येऊ नका!

औरंगाबाद | मराठ्यांना आरक्षण देता येत नसेल तर त्यांच्याकडे मतं मागायला येऊ नका, अशी भूमिका नुकतेच आमदारकीवरून पायउतार झालेले हर्षवर्धन जाधव यांनी घेतली आहे. ते औरंगाबादमधील ठिय्या आंदोलनात बोलत होते. 

सरळ विधानसभेत विधेयक आणून ते मंजूर करा. पुढे लोकसभेत मांडा. पंतप्रधान मोदी, राहुल गांधी आमच्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी एकत्रितपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. 

दरम्यान, आरक्षणासाठी मराठा तरूण बलिदान देत असतानाही सत्ताधाऱ्यांकडून धुळफेक करण्याचे काम सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या–

-अपघाताने मंत्री झालेल्या चंद्रकांत पाटलांनी थेट निवडणूक लढवून दाखवावी- शरद पवार

-संघ मराठा आरक्षण देण्यासंदर्भात सकारात्मक आहे का?- पृथ्वीराज चव्हाण

-पंकजा मुंडेंना एका तासासाठी मुख्यमंत्री बनवा; शिवसेनेची मागणी

-“पंकजा मुंडेंना जे जमू शकतं ते देवेंद्र फडणवीसांना का नाही?”

-पंकजा मुंडे बालिश, ती काय चिक्कीची फाईल आहे का?- प्रकाश आंबेडकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या