मोठी बातमी ! राहुल गांधींची खासदारकी जाणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | सध्या संसदीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधी पक्ष विरुद्ध सत्ताधारी पक्षाची खडाजंगी पहायला मिळत आहे. अशातच राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या सत्ताधारी पक्षाविरोधात पेटून उठल्याचं दिसत आहे. अनेक महत्त्वाचे प्रश्न त्यांनी संसदेत मांडल्याचं पहायला मिळालं.

दुसरीकडे आता यामुळे राहुल गांधींच्या खासदारकीला धोका निर्माण झाला आहे. बीजेपी (BJP) खासदार निशिकांत दुबे आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी विशेषाधिकार भंग प्रकरणी राहुल गांधींना नोटीस पाठवली आहे. 15 फेब्रुवारीपर्यत या नोटीसीचे उत्तर देण्यासाठी सांगितलं आहे.

7 फेब्रुवारीस संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू(President Draupadi Murmu) यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरु होती. याच चर्चेदरम्यान राहुल गाधींनी सभागृहात भाषण करताना उद्योगपती गौतमी अदानी यांच्या मुद्यावरुन केंद्र सरकारला घेरलं होतं. त्यावेळी राहुल गांधीनी वापरलेल्या भाषेवर भाजप खासदारांनी सवाल केला.

पंतप्रधानांवर कोणताही आरोप करण्यापूर्वी सभापतींना नोटीस पाठवणं अनिवार्य (Compulsory) असतं. सभापतींना तशी नोटीस न देता तुम्ही पंतप्रधानांवर आरोप करु शकत नाही. नोटीसीमध्ये 15 फेब्रुवारीपर्यंत राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर केलेल्या आरोपाचे पुरावे सादर करणं गरजेचं आहे, तसे न केल्यास राहुल गांधीना माफी मागावी लागेल. राहुल गांधी माफी मागण्यास तयार नसल्यास त्यांना लोकसभेची जागा गमवावी लागेल.

दरम्यान, जेव्हा कोणतीही व्यक्ती किंवा प्राधिकरण वैयक्तिकरित्या आणि एकत्रितपणे संसद सदस्यांच्या कोणत्याही विशेषाधिकाराचे उल्लंघन (Violation) करते किंवा दुखापत करते त्याला विशेषाधिकार भंग म्हटले जाते. राहुल गांधी यावर काय प्रतिक्रिया देतील पाहणं गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या