बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

झपाट्याने पसरणाऱ्या मंकीपॉक्सबाबत धक्कादायक माहिती समोर!

नवी दिल्ली | कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होता. जगभरात (World) मंकीपाॅक्सने शिरकाव केला. जगभरात आतापर्यंत मंकीपाॅक्सचे 14000 केसेेस आढळून आल्या आहेत. भारत देशात सुदैवाने तीनच केसेस आढळून आल्या आहेत. आता मंकीपाॅक्सबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. सेक्श्युल अ‌ॅक्टीव्हिटीमुळे मंकीपाॅक्सचा धोका वाढू शकतो, असा दावा करण्यात आला आहे.

न्यु इंग्लड जर्नल ऑफमेडिसीनमध्ये ही बातमी गुरुवारी प्रदर्शित करण्यात आली होती. यामध्ये 95 टक्केरुग्ण सेक्श्युल अ‌ॅक्टीव्हिटीमुळे समोर येत असल्याची महिती दिली आहे. लंडनच्या एका युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखालील नवीन संशोधनात 27 एप्रिल ते 24 जून 2022 दरम्यान 16 देशांमध्ये 528 मंकीपाॅक्स (MonkeyPox) संसर्गाचा अभ्यास करण्यात आला होता.

मंकीपाॅक्सचा कसा प्रसार होतो त्यांचा नागरिकांना काय त्रास होत आहे. त्या नागरिकांना कोणता आजार होतोय या सगळ्याचा अभ्यास या संशोधनात करण्यात आला. यामधील 41 टक्के लोक एचआयव्ही (HIV) संक्रमित होते. 38 वर्षांच्याजवळील या लोकांचा समावेश होता. यामध्ये 98 टक्के उभयलिंगी आणि समलिंगी लोकांचा समावेश होता.

यालेखातील प्रथम लेखक जाॅन थाॅर्नहिल यांनी सांगितलं आहे की, मंकीपाॅक्स हा पारंपारिक अर्थाने लैंगिक संक्रमित संसर्ग नाही. हे कोणत्याही जवळच्या शारीरिक संपर्काद्वारे होऊ शकते. प्रसंगी तुम्हाला ताप येत असेल,पुरळ उठली असेल तर आपल्या जोडीदारापासून लांब रहा. नाहितर तुम्ही त्यांनाही संक्रमित करू शकता. असुरक्षित शरीर संबधापासून लांब रहा. काळजी घ्या, असं आवाहन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) नागरिकांना केलं आहे.

थोडक्यात बातम्या

‘अनिल परबांचा फोन तपासा…’; दीपक केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट

‘या’ लोकांना दारूपासून जास्त धोका; अभ्यासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर

“काळजी करू नका सरकार पडणार नाही, या सरकारला दृष्ट लागू नये”

“डिलिव्हरीचा मुहूर्त ठरलेला दिसत नाही, मंत्र्यांचा पाळणा कधी हलणार?”

नीरव मोदीला ईडीचा जोर का झटका; केली ‘ही’ मोठी कारवाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More